Sujay Vikhe : अहिल्यानगर : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या काळात ‘जलजीवन मिशन’ मधील पाणी योजनांच्या कामांचे, सर्वेक्षणापासून व ठेकेदार नियुक्ती करण्यात आली. त्यांनी बसवलेल्या लोकांकडून कामे करून घेण्याची नामुष्की आमच्यावर आली आहे. कर्जत-जामखेडमधील ठेकेदार आमदार रोहित पवार (Rohit Pawar) व पारनेरमधील ठेकेदार खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांच्याशी लागेबांधे असलेले आहेत, असा आरोप माजी खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी केला आहे.
अवश्य वाचा : श्रीरामपूर काँग्रेसच्या नेत्यांच्या हाती कमळ; मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात भाजपात प्रवेश
केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील कामांची केली चौकशी
अहिल्यानगर जिल्ह्यातील जलजीवन मिशनमधील पाणी योजनांच्या कामाची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) खासदार लंके यांनी संसदेत केली होती. तसे पत्र संबंधित मंत्र्यांना दिले होते. केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील काही कामांची चौकशीही केली. या पार्श्वभूमीवर सुजय विखे बोलत होते.
नक्की वाचा : काळभैरवनाथांचा रविवारी आगडगावला यात्रोत्सव
आघाडीने बसवलेल्या लोकांकडूनच कामे करून घेण्याची नामुष्की (Sujay Vikhe)
अकोळनेर (ता. अहिल्यानगर) येथील कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार व नीलेश लंके यांच्यावर सुजय विखे यांनी टीका केली. सुजय विखे म्हणाले की, आरोप करणारे जर सायंकाळी ठेकेदाराला बोलून घेत असतील तर त्यातील वास्तविकता तपासली पाहिजे. जलजीवन मिशनमधील सर्व कामांचे सर्वेक्षण, त्याच्या निविदा, ठेकेदार नियुक्ती अशी सर्व कामे महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली आहेत. मात्र, सरकार बदलल्यामुळे त्यांचे नुकसान झाले, त्यामुळे या सर्व गोष्टी उभारल्या जात आहेत. खरंतर कार्यारंभ आदेश निघाल्यानंतर सरकार बदलले. मात्र, त्यावेळी सरकारने बसवलेल्या लोकांकडूनच कामे करून घेण्याची नामुष्की आमच्यावर आली आहे, अशी टीकाही सुजय विखे यांनी केली.