Sujay Vikhe Patil : ‘मै हू डाॅन’ गाण्यावर सुजय विखे, कर्डिलेंचा तुफान डान्स; चाहत्यांचा एकच जल्लाेष

Sujay Vikhe : 'मै हू डाॅन' गाण्यावर सुजय विखे, कर्डिलेंचा तुफान डान्स; चाहत्यांचा एकच जल्लाेष

0
Sujay Vikhe

Sujay Vikhe : नगर : आपल्या खास धमाल गाण्यांच्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेले अवधूत गुप्ते (Avadhut Gupte) यांनी गायलेल्या गाण्यांवर गुप्ते यांनी खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांना नाचायला भाग पाडलेच. आपल्या अवखळ स्वभावामुळे अवधूत गुप्ते कार्यक्रमात मोठी रंगत आणतात. अरे दिवानो, मुझे पाहचानो..  मै हू डॉन.. या गाण्यावर खासदार विखे चांगलेच नाचले. यावेळी समर्थक चाहत्यांनी खासदार विखे आणि माजीमंत्री शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) यांना खांद्यावर घेत नाचत एकच जल्लोष केला. यावेळी काळा गॉगल घालून कर्डिले आणि विखे यांनीही खांद्यावर नाचत गाण्याचा आनंद घेतला.

हे देखील वाचा: “पुन्हा दमदाटी केली तर शरद पवार म्हणतात मला”; पवारांचा आमदार सुनील शेळकेंना इशारा

कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा (Sujay Vikhe Patil)


जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून राहुरी येथे आयोजित कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आणि सांस्कृतिक महोत्सवसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. गेल्या आठवडाभरात वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या या महोत्सवाला जी गर्दी पाहायला मिळाली, त्यापेक्षा अधिक गर्दी कालच्या या भव्य सोहळ्यात दिसून आली. कला, मनोरंजन, गायन, संगीत क्षेत्रातील नामवंत सेलिब्रेटींच्या उपस्थितीत होत असल्याने या सर्व कार्यक्रमांना महिलावर्गाची जबरदस्त गर्दी दिसून येत आहे. अगदी शालेय मुली, कॉलेज युवतींपासून लग्न झालेल्या महिला, मुलं-नातवंड असलेल्या आजीबाईंपर्यंत या रंगारंग कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेताना दिसून येत आहे.

नक्की वाचा: मुख्यमंत्री साैर कृषी वाहिनी याेजनेला वेग; ४० हजार काेटींची गुंतवणूक, २५ हजार राेजगार

स्त्रीला निश्चितच मानाचे आणि आदराचे स्थान (Sujay Vikhe Patil)


याबाबत बोलताना फाउंडेशनच्या धनश्री विखे आणि खासदार सुजय विखे यांनी सांगितले की, भारतीय समाजात घरामध्ये स्त्रीला निश्चितच मानाचे आणि आदराचे स्थान दिले जाते. अनेक युवती-महिला शिक्षण आणि त्यांच्यातील कलागुण कौशल्याने नोकरी-व्यवसायात स्थिरावत असल्या तरी एकूणच स्त्रीला आजही घरातील सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे सार्वजनिक जीवनात घेता येईल, असा मनोरंजन, छंद आदींचा आनंद घेता येत नाही. घरातील कामांची व्यस्तता आणि समाज काय म्हणेल म्हणून महिलांची व्यक्ती म्हणून घुसमट होत असते. त्यामुळे आम्ही महिला दिनाचे औचित्य साधून सर्व घटकांतील युवती-महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. इतर कोणी मंडळी कार्यक्रम घेताना वेग वेगळे इप्सित डोळ्यासमोर ठेवून कार्यक्रम घेत असतील, मात्र आम्ही जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून कुठलाही राजकीय हेतू डोळ्यासमोर न ठेवता आणि याची उगाच जास्तीची प्रसिद्ध न करता केवळ महिलांच्या मनाचा विचार करून त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण पेरण्याच्या हेतूने कार्यक्रम घेत आहोत. विशेष म्हणजे आम्ही आयोजित केलेल्या कार्यक्रमांना महिला, युवतीं बरोबर अगदी नातू-पणतू असलेल्याआजीबाई देखील आवर्जून उपस्थिती लावत आहेत हे आमच्या कार्यक्रमांचे यश असल्याचे धनश्री विखे म्हणाल्या.

शेवगाव, पाथर्डी, कर्जत, जामखेड नंतर राहुरी इथे आयोजित कार्यक्रमास तर रेकॉर्डब्रेक गर्दी झाल्याचे दिसून आले. असंख्य महिलांची उपस्थिती, प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि दिलखेचक लावणी नृत्यासाठी ओळख निर्माण केलेल्या मानसी नाईक यांचे प्रेक्षकांवर भुरळ घालणारे नृत्य, प्रसिद्ध धम्माल गायक, परीक्षक अवधूत गुप्ते यांचा प्रेक्षकांची मने जिंकणारा आवाज, महिलांसाठी पैठणीसह विविध आकर्षक बक्षिसांची लयलूट आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी कर्तृत्ववान महिलांचा केलेला सन्मान, असा अनोखा आणि दैदीप्यमान सोहळा काल राहुरी येथे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात आणि रेकॉर्ड ब्रेक गर्दीसह पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here