Sujay Vikhe : सुजय विखे यांना आम्ही बहुमताने निवडून आणू; आमदार राम शिंदेंचा निर्धार

Sujay Vikhe : सुजय विखे यांना आम्ही बहुमताने निवडून आणू; आमदार राम शिंदेंचा निर्धार

0
Sujay Vikhe

Sujay Vikhe : नगर : लाेकसभा निवडणुकीत भाजपचे (BJP) उमेदवार डाॅ. सुजय विखे (Sujay Vikhe) पाटील यांना आम्ही बहुमताने निवडून आणू, असा निर्धार आमदार राम शिंदे (MLA Ram Shinde) यांनी केला आहे. 

नक्की वाचा: उत्कर्षा रुपवते यांच्या रुपाने वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात?

निवडणूक प्रचार नियोजनासंदर्भात जामखेड येथे बैठक (Sujay Vikhe)

लाेकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निवडणूक प्रचार नियोजनासंदर्भात आमदार राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जामखेड येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत निवडणुकीची रणनीती ठरविण्यात आली. यावेळी राम शिंदे यांनी कार्यकर्यांत नवी ऊर्जा दिली आणि सुजय विखे पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला. यामुळे डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विजयाच्या वाटा अधिक सोयीस्कर झाल्या आहेत.  

हे देखील वाचा : नगरच्या पहिल्या खासदाराने जनतेसाठी फोडलं होतं सरकारी गोदाम

गैरसमज उरणार नसल्याचे आश्वासन (Sujay Vikhe)

मागील काही दिवसांपासून सुजय विखे आणि राम शिंदे यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा होत होत्या. मात्र, मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीतुन सर्व वाद संपुष्टात आले. याची प्रचिती या कार्यकर्ता मेळाव्यात दिसून आली. भाजप कार्यकर्त्यांनी सुजय विखे पाटील आणि आमदार राम शिंदे यांच्यापुढे आपल्या समस्या आणि अडचणी मांडल्या. त्यांना उत्तर देताना डॉ. सुजय विखे पाटील यांनी कोणतेही समज गैरसमज उरणार नाही, असे आश्वासन दिले.

तर आमदार राम शिंदे यांनी कार्यकऱ्यांशी संवाद साधत सुजय विखे आणि राम शिंदे एकत्र त्यांच्यात कोणतेही मदभेद नसून एकदिलाने आणि सर्व ताकतीने डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासाठी काम करायचे आहे, असे सांगत जामखेड मधून सर्वाधिक मते ही सुजय विखे यांना मिळतील असे आश्वासन दिले. तसेच प्रचाराचे नियोजन कसे असणार याबाबत मार्गदर्शन केले. पुन्हा एकदा सुजय विखेंच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करायचे आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी विधी आघाडी जिल्हा अध्यक्ष प्रवीण सानप,  जिल्हा उपाध्यक्ष रवी सुरवसे, सलीम बागवान, शरद कार्ले, बिभीषण धनवडे, डॉ. भगवान मुरूमकर, सोमनाथ राळेभात, संजीवनी पाटील, अजय काशीद, मनीषा मोहलकर, बापूराव ढवळे आदी उपस्थित हाेते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here