Sujay Vikhe : नगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या मेळाव्यात शरद पवार गटाचे उमेदवार नीलेश लंके यांना खुले आव्हान दिले. लंके यांच्या उमेदवारीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी सुपा (ता. पारनेर) व मोहटादेवी (ता. पाथर्डी) येथील सभांत विखे कुटुंबावर टीका केली होती. या टीकेला विखेंनी प्रतिउत्तर दिले आहे.
हे देखील वाचा: सुप्याच्या एमआयडीसीत खंडणी बहाद्दर गोळा झालेत – राधाकृष्ण विखे पाटील
खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले की (Sujay Vikhe)
“महिनाभर त्यांनी मी केली इंग्रजी व हिंदी भाषणे पाठ करून वाक्यरचना तिच मांडली तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही. मी त्यांना महिना देतो. मी जेवढी इंग्रजी व हिंदी भाषणे केली, ती रात्रं-दिवस पाठ करा. उमेदवारी अर्ज भरायला अजून २० दिवस बाकी आहेत. त्यांना जर माझी भाषणे पाठ झाली तर मी उमेदवारी अर्ज भरणार नाही,” असे खुले आव्हान त्यांनी लंकेंना दिले.
नक्की वाचा: लोकसभा निवडणुकीत माझा फोटो,नाव कुणीही वापरू नयेत-मनोज जरांगे
ते पुढे म्हणाले की (Sujay Vikhe)
“समोरचा उमेदवार का दिल्लीला जाऊ पाहत आहे. तिथे काय फिरायला जायचे, अक्षरधामला जायचे, वैष्णवदेवीच्या दर्शनाला जायचे? आपण खासदार का व्हायचे आहे हे कळणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्षांच्या एकमेव उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होईल. तो म्हणजे अहिल्यानगरमधील आमचा विरोधी उमेदवार असेल,” अशी नाव न घेता टीका त्यांनी केली.
संग्राम जगताप आमदार झाल्यावर ते मला भेटले. त्यांच्याशी मी बोललो, “आपण मतभेद विसरून जनतेने आपल्याला ज्या गोष्टीसाठी निवडून दिले. ते काम आपण एकत्रित करायला पाहिजे. जेव्हा दोन वेगळ्या पक्षाचे लोक एकत्रित येऊन काम करतात त्यावेळी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली विकासाची कामे मार्गी लागतात. जनतेचे विकासाचे स्वप्न पूर्ण होते,” असे त्यांनी सांगितले.
डॉक्टर साहेबांना हिंदी इंग्रजी मराठी येत असतानाही त्यांनी संसदेमध्ये किती प्रभावीपणे मतदार संघातील प्रश्न मांडले व त्यावरती जनतेला दिलासा दिला याबद्दल त्यांनी बोलावं एखाद्या व्यक्तीचे कर्तृत्व त्याला येणाऱ्या भाषेवर सिद्ध होत नसतं तर त्यांनी केलेल्या कामावरती सिद्ध होत असते तुमचा पराभव अटळ आहे लावा ताकद