Sujay Vikhe : नगर लाेकसभेतून सुजय विखे पुन्हा दिल्लीत जातील; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा निर्धार

Sujay Vikhe : नगर लाेकसभेतून सुजय विखे पुन्हा दिल्लीत जातील; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा निर्धार

0
Sujay Vikhe
xr:d:DAF5Y3epXKI:866,j:7343542912016993755,t:24040314

Sujay Vikhe : नगर : रीलपेक्षा रियलमध्ये विकास करणाऱ्या खासदाराला आपल्याला संसदेत पाठवायचे आहे. नगर लाेकसभेतून भाजपचे (BJP) उमेदवार डाॅ. सुजय विखे (Sujay Vikhe) पाटील यांना पुन्हा संसदेत पाठवायचे आहे, असा निर्धार आमदार संग्राम जगाताप (MLA Sangram Jagtap) यांनी राष्ट्रवादीच्या (NCP) आयाेजित मेळाव्यात व्यक्त केला. 

Sujay Vikhe
xr:d:DAF5Y3epXKI:857,j:8300557802264794818,t:24040307

हे देखील वाचा: सुप्याच्या एमआयडीसीत खंडणी बहाद्दर गोळा झालेत – राधाकृष्ण विखे पाटील

विकासकामांची दाखवली चित्रफीत (Sujay Vikhe)

आयाेजित मेळाव्यात आमदार संग्राम जगताप यांनी सुजय विखे पाटील आणि त्यांनी केलेल्या विकासकामांची चित्रफीत दाखवत जनतेला केवळ विकासासाठी मत देण्याचे आवाहन केले. तर काही लोक केवळ रीलमध्ये विकास करण्याचा दावा करतात, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. संग्राम जगताप म्हणाले, ”राष्ट्रवादी अजित पवार आणि भाजपची युती असल्याने महायुतीच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याची जबाबदारी राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची आहे. सुजय विखे पाटील यांच्यासाठी काम करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले. सुजय विखे आणि आपण नगर जिल्ह्याच्या विकासाचा रोड मॅप तयार केला आहे. ताे लवकरच लोकांसमोर आणू.  ही निवडणूक देशासाठी असून देशाबरोबर नगरचा निकाल सुद्धा विक्रमी असेल, असे त्यांनी आश्वासन दिले.”

xr:d:DAF5Y3epXKI:867,j:6116312013583841217,t:24040314

नक्की वाचा: लोकसभा निवडणुकीत माझा फोटो,नाव कुणीही वापरू नयेत-मनोज जरांगे

डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले (Sujay Vikhe)

”मागील निवडणुकीत आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो. पण आज युतीच्या माध्यमातून संग्राम जगताप यांनी जे सहकार्य दाखवले ते मोठ्या कौतुकाचे आहे. येणाऱ्या काळात आमदार संग्राम जगताप यांच्या खांद्याला खांदा लावून आपण नगर जिल्ह्याचा कायापालट करू, महिलांची सुरक्षा, तरुणांच्या हाताला काम, गरिबांना स्वस्त दरात घरे, वाहतुकीच्या सुविधा अशा विविध विकास कामांच्या बाबतीत आम्ही चर्चा केली असून लवकरच एक आदर्श जिल्हा म्हणून आम्ही दोघे नावारुपास आणू, असे आश्वासन विखे पाटील यांनी आपल्या भाषणातून दिले. 

यावेळी माजी आमदार अरुण जगताप, राष्ट्रवादी नगर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, उपमहापौर गणेश भोसले, रयत शिक्षण संस्थेचे ज्ञानदेव पांडुळे, सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष श्रणिक संघवी, राजेश बोथरा, संजय चोपडा, निखिल वारे आदी उपस्थित हाेते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here