Sujay Vikhe : नगर : लाेकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) ही देशाचे नेतृत्व ठरवणारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणारी निवडणूक आहे. देशाचा आणि जिल्ह्याचा विकास हवा असेल, तर माेदी यांच्या शिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन भाजपचे (BJP) उमेदवार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) पाटील यांनी खरवंडी कासार येथील बूथ कमिटी सभेत केले.
नक्की वाचा: अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी तुरुंगातून सुटणार; हायकाेर्टाचे मुदतपूर्व सुटकेचे निर्देश
बूथ कमिटी सक्षमीकरण मेळावा (Sujay Vikhe)
नगर लोकसभा प्रचार सभेत आघाडी घेतलेले महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामांची माहिती गावोवावी पोहचवण्यासाठी बूथ कमिटीच्या माध्यमातून सुरू आहे. बूथ कमिटी सक्षमीकरण मेळावे घेण्याचा सपाटा महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी लावला आहे.
हे देखील वाचा: मद्यपींनाे लक्ष द्या; जिल्ह्यात चार दिवस ‘ड्राय डे’, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
गावोगावी जाऊन महायुतीचा प्रचार (Sujay Vikhe)
डॉ. सुजय विखे पाटील हे विद्यमान खासदार असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीचे उमेदवार आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांनी आपल्या प्रचाराचा सपाटा लावला आहे. गावोवावी जाऊन ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून आणि महायुतीच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. त्यासाठी मतदार संघातील सर्व तालुकास्तरावरील बूथ कमिटीच्या बैठका घेणे, कार्यकर्ता मेळावे घेणे, घटक पक्षांच्या सभा घेण्याचे काम ते साध्य करत आहेत. अशीच बूथ कमिटीची बैठक खरवंडी कासार येथे शुक्रवारी बोलावण्यात आली होती. यावेळी सुजय विखे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधताना तीन वर्षांच्या काळात तालुक्याला एक रुपयांचा सुद्धा निधी दिला नसल्याचा आरोप व्यक्त केला. तर दुसरीकडे महायुतीच्या दीड वर्षाच्या काळात जिल्ह्यातील सर्वच गावात कोणत्या ना कोणत्या माध्यमातून निधी दिला आहे. यामुळे जर देशाचा आणि जिल्ह्याचा विकास पाहिजे असेल, तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त देशाला दुसरा पर्याय नाही. म्हणून ही निवडणूक महत्वाची असून त्यासाठी आपण मतदान केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. मी फक्त विकासावर मत मागत असून मी फक्त आपल्याला विकास देऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.
अवश्य वाचा: मतदानाचे वय २१ वरुन १८ का केले?