Sujay Vikhe : नगर : सध्या लाेकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर सत्ताधारी विराेधकांमध्ये जाेरदार टीका टिप्पणी सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे (BJP) उमेदवार डाॅ. सुजय विखे (Sujay Vikhe) पाटील यांनी विराेधकांवर निशाणा साधला आहे. ”काँग्रेसने (Congress) जाहीर केलेला जाहीरनामा हा केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलीली धूळफेक आहे. केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी हा जाहीरनामा प्रकाशित केला आहे, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.
हे देखील वाचा: ‘संपदा पतसंस्था’ अपहार प्रकरणी वाफारेसह २२ जण दोषी
बूथ सक्षमीकरण मेळावा
शेवगावात बूथ सक्षमीकरण संवाद मेळावा आयोजित कार्यक्रमात त्यांनी कॉंग्रेसच्या जाहिरनाम्याचा समाचार घेत कॉंग्रेसवर हल्ला चढविला. काँग्रेसने आपल्या जाहिरनाम्याचे नाव ‘न्यायपत्र’ दिले आहे. जर कॉंग्रेसला आता न्याय द्यायचा आहे, तर ५५ वर्षांच्या काळात केवळ अन्याय केला का?, असा सवाल सुद्धा डॉ. विखे यांनी विचारला आहे. अनेक दशक देशात कॉंग्रेसने सत्ता उपभोगली अनेक लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहिरनामे प्रकाशित केले. पण आजतयागत त्यांनी आपल्या जाहिरनाम्यातील एकही आश्वासन पूर्ण केले नाही, असा दावा डॉ. सुजय विखे यांनी केला. केवळ निवडणुकीच्या तोंडावर आश्वासनाचे गाजर दाखवत लोकांची फसवणूक करण्याचे काम आतापर्यंत कॉंग्रेस करत आली आहे. यामुळे हा जाहीरनामा केवळ कागदापुरता मर्यादित आहे. पुन्हा देशाचे पंतप्रधान हे केवळ नरेंद्र मोदीच होतील, देशात केवळ मोदींची गॅरंटी टीकू शकणार आहे.” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नक्की वाचा: कर्जदाराची दोन कोटी रक्कम परस्पर वर्ग केली सावकाराच्या खात्यात
नवा इतिहास घडणार (Sujay Vikhe)
मागील दहा वर्षाच्या काळात देशाने जगात जे नावलौकिक मिळविले, ते केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच, मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश महासत्तेकडे वाटचाल करत आहे. देशात आर्थिक सुधारणांना गती मिळत आहेत. मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून उद्योजक, व्यावसायिक तयार होत आहेत. त्याचबरोबर उज्ज्वला योजना, वयोश्री योजना, पीएम किसान सन्मान योजना, आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, अशा अनेक योजनांमार्फत सरकार हे शेतकरी, गोरगरीब, महिला आणि तरूणाच्या मागे खंबीर उभे आहे. हे दाखवून दिले. यामुळे अबकी बार ४०० पार होऊन या देशात नवा इतिहास घडणार असल्याचा दावा डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
Table of Contents