Sujay Vikhe : तरुणांमधील सुजय विखेंची क्रेझ विराेधकांसाठी डाेकेदुखी; सेल्फी काढण्यासाठी तरुणांचा गराडा

Sujay Vikhe : तरुणांमधील सुजय विखेंची क्रेझ विराेधकांसाठी डाेकेदुखी; सेल्फी काढण्यासाठी तरुणांचा गराडा

0
Sujay Vikhe
Sujay Vikhe

Sujay Vikhe : नगर : यंदाच्या निवडणुकीत तरुण नवमतदार महत्वाची भूमिका बजावणार आहेत. यामुळे तरुणांना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकारणी सोशल मीडियाचा (Social media) वापर करत त्यांच्या पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात नगर लाेकसभा मतदार (Lok Sabha Voters) संघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) पाटील हे अग्रेसर स्थानी आहेत. तरुणांमध्ये त्यांचे क्रेज वाढत असून त्यांच्या बरोबर सेल्फी काढण्यासाठी तरुणांची मोठी झुंबड पहायला मिळत आहे. तरुणांमधील डॉ. सुजय विखे यांची क्रेझ ही विरोधकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहेत.  

हे देखील वाचा: ‘वाघाची शेळी झाली’; माेदींना पाठिंबा जाहीर केल्यानंतर काँग्रेसच्या नेत्याची राज ठाकरेंवर टीका

सोशल मीडियाच्या खात्यावर करताहेत प्रसारित (Sujay Vikhe)

लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात नवमतदार मतदान करणार आहेत. तरुणांमध्ये सेल्फीचे मोठे क्रेझ आहे. आपल्या आवडत्या नेत्याबरोबर सेल्फी काढण्याचा उत्साह वेगळाच असल्याचे अनेक तरुण विविध उमेदवाराबरोबर सेल्फी काढून सोशल मीडियाच्या खात्यावर प्रसारित करत आहेत. नगरमध्ये ही क्रेझ तरुणाईमध्ये पहायला मिळत आहे. त्यात सुजय विखे पाटील यांना मोठी पसंती मिळत आहे. सुजय विखे यांनी प्रचारानिमित्त प्रचार सभा आणि गाठी भेटींचा सपाटा लावला आहे. दररोज विविध ठिकाणी डॉ. सुजय विखे पाटील  मतदारांच्या गाठी भेटी घेत आहेत. यावेळी सभा संपल्यावर मोठ्या प्रमाणात तरुण सेल्फी काढण्यासाठी त्यांच्या भोवती गराडा घालत आहेत.  

Sujay Vikhe
Sujay Vikhe

नक्की वाचा: नाना पटोलेंच्या कारचा भीषण अपघात;उभ्या गाडीला भरधाव ट्रकची धडक

तरुणांकडून सेल्फी काढण्याची मागणी (Sujay Vikhe)

प्रचाराच्या दरम्यान लोकांशी संवाद साधताना ठिकठिकाणी त्यांच्या भोवती तरुणांचा वेढा निर्माण होऊन सेल्फी काढण्याची मागणी करतात. सुजय विखे पाटील ही तरुणांच्या मागणीला हसून प्रतिसाद देतात. यामुळे समाज माध्यमावर सर्वत्र त्यांचे फोटो दिसत आहेत. यामुळे सुजय विखे यांना आता सेल्फी आयकॉन म्हणुन ओळख मिळत आहे. तरुणामध्ये सुजय विखेची वाढती पसंती ही विरोधकांसाठी धोकादायक असल्याने त्यांना काऊंटर करण्यासाठी विरोधकांकडून विविध युक्त्या आखल्या जात आहेत. पण त्याचाही फायदाच सुजय विखे यांना होताना दिसत आहे. कारण कोणतेही विरोधात्मक विधाने न करता, केवळ विकास कामाचे मुद्दे घेऊन सुजय विखे प्रचार करत असल्याने त्यांच्या विरोधात वैयक्तिक स्वरुपाच्या होणाऱ्या टीकांना तरुणच उत्तरे देताना दिसत आहेत. यामुळे तरुणाईमध्ये सोशल मीडियाच्या पडद्यावर डॉ. सुजय विखे पाटील यांचा विजय झाल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here