Sujay Vikhe Patil : महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संघर्षाचा विजय : सुजय विखे पाटील

Sujay Vikhe Patil : महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संघर्षाचा विजय : सुजय विखे पाटील

0
Sujay Vikhe Patil

Sujay Vikhe Patil : नगर तालुका: केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत कांदा निर्यात बंदी (Onion export ban) उठवण्यात आलेली आहे. कांदा निर्यातबंदी उठवल्यामुळे महाराष्ट्र आणि देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कांदा उत्पादन होत असताना विशेष करून नगर, नाशिक, पुणे जिल्ह्यातील शेतकरी कांदानिर्यात बंदी निर्णयामुळे हवालदिल झाले होते. जवळपास ५० हजार टन कांदा एकट्या बांगलादेशसाठी भारतातून निर्यात होण्यासाठी ही परवानगी देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar) यांच्या माध्यमातून वारंवार केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेत राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या. विशेष करून नगर, नाशिक, पुणे पट्ट्यातील कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात असल्याने कांदा निर्यात बंदीचा फटका बसत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे असल्याची भूमिका यावेळी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासमोर मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनीही शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मोदी गॅरेंटी यानुसार केंद्र सरकारने निर्णय घेतला असून कांदा निर्यात बंदी उठवण्यात आलेली आहे. हा एक प्रकारे नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संघर्षाचा विजय असल्याचे प्रतिपादन खासदार डाॅ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी केले.

हे देखील वाचा: …तर मंत्री, आमदारांना मराठा विराेधी जाहीर करू; मनाेज जरांगेंचा इशारा

शेतकऱ्यांच्या वतीने खासदार सुजय विखे यांचा सत्कार (Sujay Vikhe Patil)


नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या वतीने खासदार सुजय विखे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंत्री शिवाजी कर्डिले, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, हरिभाऊ कर्डिले, सुरेश सुंबे, माजी नगरसेवक निखिल वारे, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, धर्माजी आव्हाड, संतोष म्हस्के आदींसह व्यापारी, हमाल, महिला तसेच शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नक्की वाचा: शिवरायांच्या रणनीतीला मानवतेचा सुगंध’: एकनाथ शिंदे

तीन लाख मॅट्रिक टन कांद्याला निर्यात परवानगी (Sujay Vikhe Patil)


यावेळी माजी मंत्री शिवाजी कर्डिले म्हणाले, खासदार सुजय विखे त्याचबरोबर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सातत्याने केंद्र सरकारकडे विशेष करून केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी प्रयत्न केले. या अनुषंगाने काल दिल्लीमध्ये झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीमध्ये अमित शहा यांनी तीन लाख मॅट्रिक टन कांद्याला निर्यात परवानगी दिलेली आहे. या निर्णयामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुजय विखे त्याचबरोबर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिल्ली सरकारकडे वारंवार केलेल्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय उठवलेला असल्याने शेतकऱ्यांनी आज त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला आहे. मोदी सरकारमुळे आपल्याला आता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा दिवाळी साजरी करण्याची पर्वणी मिळाली आहे, असे वक्तव्य केले. अनेक जण टीका करायची म्हणून काहीही टीका करत असले तरी दिलेले आश्वासन पाळणे ही विखे कुटुंबाची ओळख असल्याचं कर्डिले यावेळी म्हणाले.

Amit Shah

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here