Sujay Vikhe Patil : आरोग्य सेवेपासून कोणताच घटक वंचित राहणार नाही : सुजय विखे पाटील

Sujay Vikhe Patil : आरोग्य सेवेपासून कोणताच घटक वंचित राहणार नाही : सुजय विखे पाटील

0
Sujay Vikhe Patil

Sujay Vikhe Patil : कर्जत : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार (Central Govt) समाजाच्या तळागाळापर्यंत काम करीत असून सब का साथ, सबका विकास या ध्येयावर मार्गक्रमण करीत आहे. देशासह महाराष्ट्र राज्य आणि मतदारसंघातील आरोग्य प्रश्नांवर केंद्र सरकारने आपले लक्ष केंद्रित केले आहे. आरोग्य सेवेपासून कोणताच घटक वंचित राहणार नाही, याची खबरदारी आम्ही घेत आहोत, असे प्रतिपादन खासदार डाॅ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी केले. कर्जत येथे वयोश्री अंतर्गत लाभार्थी साहित्य वाटप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

हे देखील वाचा: ‘मनोज जरांगे मारुतीचं शेपूट; तो शांत बसणार नाही’: छगन भुजबळ

कांदा निर्यात बंदी उठवण्याचा ऐतिहासिक निर्णय (Sujay Vikhe Patil)


भारत सरकार, सामाजिक न्याय मंत्रालय व खासदार सुजय विखे पाटील यांच्या पुढाकारातून राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या लाभार्थ्यांना विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी विखे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. देश स्वतंत्र झाल्यापासून प्रथमताच या योजना अंमलात आणल्या आहेत. शेतकऱ्यांचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांची ओळख निर्माण झाली आहे. पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे या सर्वांच्या पुढाकाराने राज्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणारे कांदा निर्यात बंदी उठवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. आपण स्वत: दिल्लीमध्ये जाऊन याबाबत शेतकऱ्यांची नेमकी भूमिका काय आहे? कांदा निर्यात बंदी उठवणे का आवश्यक आहे? याची माहिती केंद्रीय मंत्री अमित शहा यांना दिली. यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी देखील मोलाचे मार्गदर्शन केले होते. त्याचा सकारात्मक परिणाम होत दोनच दिवसांमध्ये कृषीमंत्री यांनी कांदा निर्यात बंदी उठवली. याचा मोठा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांना झाला.

Sujay Vikhe Patil

नक्की वाचा : सत्यपाल मलिक यांच्या घरी सीबीआयची छापेमारी  

आगामी काळात केंद्रात भाजपा व घटक पक्षांची सत्ताच येणार (Sujay Vikhe Patil)

शेतमालाला सर्वात जास्त हमीभाव भाजपा सरकारच्या काळामध्ये मिळाला. यासह शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान सर्वाधिक याच काळात दिले गेले. समाजातील प्रत्येक घटकाला मदत आणि न्याय देण्याचं काम फक्त भाजप सरकारनेच केले आहे. यामुळे संपूर्ण जनता भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे. आगामी काळात केंद्रात भाजपा व एनडीएच्या घटक पक्षांची सत्ताच येणार असून आणि राज्यांमध्ये देखील सर्वाधिक जागा महायुतीच्याच निवडून येतील, असा विश्वास खासदार सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. वयोश्री योजना अंतर्गत कर्जत तालुक्यातील ८३५ लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या विविध योजनांमध्ये खासदार सुजय विखे यांनी लाभ मिळवून दिला. यामध्ये अपंग वयोवृद्ध व्यक्तींना बॅटरीवर चालणारी मोटार सायकल, व्हीलचेअर, सायकल, कमोड, काठ्या, चष्मे, मोबाईल श्रवण यंत्र यासह इतर सर्व साहित्य याचे वाटप करण्यात आले.


यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, सभापती काकासाहेब तापकीर, अशोक खेडकर, दादासाहेब सोनमाळी, शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख डॉ. शबनम इनामदार, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे, बाळासाहेब शिंदे, उपसभापती अभय पाटील, तालुकध्यक्ष बापूसाहेब नेटके, अल्लाउद्दीन काझी, दिग्विजय देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दादासाहेब सोनमाळी यांनी आभार मानले.

Sujay Vikhe Patil
Sujay Vikhe Patil

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here