Sujay Vikhe Patil : कर्जत : तालुका प्रशासनाने प्रस्ताव येण्याची वाट न पाहता प्रत्यक्ष गावांची पाहणी करून पाणी टंचाईची (Water shortage) तीव्रता आणि आवश्यकता असल्यास तत्काळ टँकर देण्याची व्यवस्था करावी. जेणेकरून ग्रामस्थ आणि नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही. टंचाई काळात प्रशासनाच्या (Administration) हलगर्जीपणाचा फटका लोकप्रतिनिधीना बसतो. त्यामुळे नियोजन करून काम करा, असे आवाहन खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी केले. कर्जत प्रांताधिकारी कार्यालयात तालुका टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते.
नक्की वाचा: मराठ्यांनी पीएम मोदींविरोधातच थाेपटले दंड; वाराणसीतून एक हजार उमेदवारी अर्ज दाखल करणार
विखे पाटील म्हणाले (Sujay Vikhe Patil)
पाच गावाचा आढावा देताना अधिकारी निरुत्तर होत आहे. याची शोकांतिका वाटते. आपण काम करीत आहात याबद्दल शंका नाही. पण मंजूर केलेला टँकर नेमका कुठे खाली करता. तो कुठे वितरण करता, हे सांगता येत नाही. असे काम उचित नाही. टंचाई गावामध्ये पाण्याची वितरण व्यवस्था काय आहे ? पाणी कुठे टाकले जातात याची पाहणी शासनाने करावी. वार्डनिहाय, प्रभागनिहाय टँकर पाणी वितरण करण्याचे नियोजन आखणी करावी. त्याचे तंतोतंत पालन करावे. या काळातील प्रशासनाच्या कामाचा फटका अप्रत्यक्ष लोकप्रतिनिधींना बसतो. त्यामुळे प्रत्यक्ष पाहणी करून प्राप्त अहवालानुसार मागणीप्रमाणे टँकर द्यावे. यासाठी पक्ष पाहू नका. सर्वसामान्य लोकांसाठी काम करा. अडचणी आल्यास तत्काळ फोन करा. त्यावर निश्चित सर्वांच्या सहकार्याने मार्ग काढू. एकमेकांची उणी-दुणी काढण्यापेक्षा टंचाईस सामोरे जाऊ. आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा देऊ असे म्हणत कर्जत तालुक्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा प्रशासनाकडून घेतला.
हे देखील वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले देशातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचं उद्घाटन
पदधिकाऱ्यांची उपस्थिती (Sujay Vikhe Patil)
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे, अशोक खेडकर, अनिल गदादे, सागर लाळगे, तात्यासाहेब माने, विलास राऊत, शाहू भोसले यांनी टंचाई परिस्थितीबाबत अडचणी मांडल्या. सदर बैठकीसाठी प्रांताधिकारी नितीन पाटील, तहसीलदार गणेश जगदाळे, सहायक गटविकास अधिकारी रूपचंद जगताप यांच्यासह बाजार समितीचे उपसभापती आबा पाटील, दादासाहेब सोनमाळी, नंदलाल काळदाते, विनोद दळवी, अण्णा मेहेत्रे, दिग्विजय देशमुख आदी उपस्थित होते.