Sujay Vikhe Patil : पारनेर : तालुक्यातील ढवळपुरी येथे ‘लोकर प्रक्रिया केंद्र’ (Wool Processing Centre) स्थापन करण्यासाठी शासनाच्या १.७० हेक्टर जमिनीस मान्यता देण्यात आली आहे. मेंढपाळ बांधवांच्या हिताचा निर्णय घेऊन त्यांच्या मागणीला महायुती सरकार (Mahayuti sarkar) मार्फत न्याय देण्यात आला असल्याचे मत खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी व्यक्त केले.
नक्की वाचा: मी लोकसभा निवडणूक लढवावी ही जनमाणसाची भावना – नीलेश लंके
विखे पाटील म्हणाले
ढवळपुरी येथे लोकर प्रक्रिया केंद्र स्थापन व्हावे आणि त्यासाठी शासनाची जमीन उपलब्ध व्हावी, याकरिता माझे प्रयत्न सुरू होते. यासाठी वेळोवेळी पाठपुरावा देखील केला होता. आज त्या प्रयत्नांना यश मिळाले असून निश्चितच मेंढपाळ बांधवांसाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक असा ठरणार आहे. कारण मेंढपाळांची पंढरी म्हणून ढवळपुरी गावाला ओळखले जाते. त्यामुळे लोकर प्रक्रिया केंद्र येथे स्थापन होणे ही काळाची गरज होती.
हे देखील वाचा :लोकसभा निवडणुकीची उद्या आचार संहिता जाहीर होणार
आश्वासनाची पूर्तता (Sujay Vikhe Patil)
विशेष म्हणजे नुकत्याच काही दिवसांपूर्वी सदरील प्रकल्पास पारनेर तालुक्यातील करंदी येथे निर्माण करण्याचे नियोजन होते. कारण ढवळपुरी येथील के. के. रेंजमुळे हा प्रकल्प शासनाकडून नाकारण्यात आल्याचे समोर आले होते. दरम्यान मेंढपाळ बांधवांची मागणी लक्षात घेता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सदरील केंद्र निर्माण करण्याच्या अनुषंगाने ज्यांची कोणाची हरकत असेल तर तसे शासनास कळवावे. त्यावर योग्य तो विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. आज त्या आश्वासनाची पूर्तता करण्यात आली आहे. दरम्यान,आज शासनातर्फे १.७० हेक्टर जमिनीस मान्यता देण्यात आली असून मेंढपाळ बांधवांचा प्रश्न हा सुटला आहे.