Sujay Vikhe Patil : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांच्या इमारत बांधकामास भरीव निधी मंजूर : सुजय विखे पाटील

Sujay Vikhe Patil : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांच्या इमारत बांधकामास भरीव निधी मंजूर : सुजय विखे पाटील

0
Sujay Vikhe Patil
Sujay Vikhe Patil

Sujay Vikhe Patil : नगर : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) अंतर्गत कर्जत तालुक्यातील तीन गावांमध्ये तसेच राहुरी, श्रीगोंदे आणि जामखेड तालुक्यातील प्रत्येकी एका गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या (Primary Health Sub-Centre) नवीन मुख्य इमारतीच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : नगर अर्बन बँक आर्थिक घोटाळा जामीन अर्ज नामंजूर

शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन (Sujay Vikhe Patil)

कर्जत तालुक्यातील मौजे बहिरोबावाडी, मौजे सीतपूर आणि मौजे म्हाळंगी येथे तसेच राहुरी तालुक्यातील मौजे चेडगाव, श्रीगोंदे तालुक्यातील मौजे मुगुंसगाव आणि जामखेड तालुक्यातील मौजे जवळके येथे नवीन उपकेंद्र इमारतीचे बांधकाम करण्याच्या कामासाठी प्रत्येकी ५५.५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी दिली. जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य उपकेंद्र निर्माणासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे नागरिकांनी मागणी केली असता त्यांनी शासनस्तरावर याबाबतीत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे या नवीन उपकेंद्रांच्या इमारत बांधकामासाठी शासनाकडून भरीव निधी उपलब्ध झाला आहे. याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आणि नागरिकांना मोठा दिलासा यामुळे मिळणार असल्याचे स्पष्ट केले.

नक्की वाचा: मी लोकसभा निवडणूक लढवावी ही जनमाणसाची भावना – नीलेश लंके

आरोग्य क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याकडे नगर जिल्ह्याची वाटचाल (Sujay Vikhe Patil)

आरोग्याच्या बाबतीत संपूर्ण जिल्ह्यात विविध सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मत सुजय विखेंनी मांडले. आरोग्य क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याकडे नगर जिल्ह्याची वाटचाल सुरू झाली आहे. येणाऱ्या काळात सर्वांनाच आपल्या जवळील उपकेंद्रात उपचार घेणे शक्य होईल, असे मत खासदार विखे पाटील यांनी मांडले. तसेच त्यांनी हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, आमदार राम शिंदे व आमदार बबनदादा पाचपुते यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here