Sujay Vikhe Patil : कर्जत: मागील काही काळात जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली. यामुळे जे समज-गैरसमज झाले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या बैठकीत एक परिवार म्हणून त्याची चर्चा झाली. त्यांचे निरसन करण्यात आले. प्रा राम शिंदे (Ram Shinde) यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत-जामखेड मतदारसंघ यासह जिल्ह्यात मागील पेक्षा जास्त मताधिक्य देण्याची ग्वाही स्थानिक नेते, राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आजच्या बैठकीत दिली. ज्या चर्चा झडत होत्या, त्यास पूर्णविराम मिळत एकदिलाने महायुती म्हणून लोकसभा निवडणुकीस सामोरे जात विक्रमी मताधिक्याने विजयी होण्याचा विश्वास सुजय विखे पाटील यांनी (Sujay Vikhe Patil) व्यक्त केला. कर्जत येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नक्की वाचा: नगरकरांवर पाणी कपातीचे संकट
पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी कार्यकर्ते कामाला
यावेळी माजीमंत्री आमदार राम शिंदे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग आदी उपस्थित होते. यावेळी सुजय विखे आणि राम शिंदेंनी गळाभेट घेत आपले मतभेद संपत मनोमिलन झाला असल्याचा संदेश दिला. यावेळी विखे पाटील म्हणाले, पंतप्रधान मोदी हेच विकास आहे आणि भविष्य आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात केलेला विकासकामांच्या जोरावरच या निवडणुकीत सामोरे जाणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा त्या पदावर पाहण्यासाठी महायुतीचे सर्वसामान्य कार्यकर्ते कामाला लागले आहेत. जे शब्द मतदारांना दिले होते ते निश्चित पुरे केले आहेत. काम करताना काही चुका देखील घडल्या आहेत. त्या दुरुस्त करून पुढे मार्गक्रमण करीत आहे.
हे देखील वाचा: सुप्याच्या एमआयडीसीत खंडणी बहाद्दर गोळा झालेत – राधाकृष्ण विखे पाटील
चर्चेनंतर सर्व शंका-समज-गैरसमज दूर (Sujay Vikhe Patil)
साधी राहणीमान ठेवूनच तुमच्यातील एक माणूस म्हणून काम केले आहे. सर्वसामान्य माणसांना सहज भेटता यावे, म्हणून आपण ते अंगिकारली आहे. आमदार राम शिंदे म्हणाले, भाजप हा शिस्तप्रिय पक्ष आहे. पक्ष नेतृत्वाने जे निर्णय घेतले आहे त्यास बांधील असून त्याचे स्वागत देखील केले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या चर्चेनंतर सर्व शंका, समज-गैरसमज दूर झाले. सुजय विखेंना कर्जत-जामखेडसह जिल्ह्यातून अधिक मताधिक्य देण्यासाठी प्रामाणिक आणि निष्ठावान भाजपाचा कार्यकर्ता म्हणून प्रयत्न करणार आहे. यावेळी बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, तालुकाध्यक्ष शेखर खरमरे, उपसभापती आबा पाटील, जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, दादा सोनमाळी, अशोक खेडकर यांच्यासह स्थानिक नेते, राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.