Sujay Vikhe Patil : ती ऑडिओ क्लिप म्हणजे पारनेरचे वास्तव – डॉ. सुजय विखे पाटील

Sujay Vikhe Patil : ती ऑडिओ क्लिप म्हणजे पारनेरचे वास्तव - डॉ. सुजय विखे पाटील

0
Sujay Vikhe Patil
Sujay Vikhe Patil

Sujay Vikhe Patil : नगर : व्हायरल (Viral) झालेली ऑडिओ क्लिप (Audio clip) म्हणजे पारनेरचे वास्तव आहे. माझ्या कार्यकर्त्याने केवळ टीव्हीवर प्रतिक्रिया दिली होती. तर समोरच्या व्यक्तीने मला गोळ्या घालण्याची धमकी दिली. ज्यांचे कार्यकर्ते खासदाराला गोळ्या घालण्याची धमकी देत असतील सर्वसामान्य जनतेने काय करायचं? मागील ५० वर्षे जिल्ह्यातील नागरिकांनी आमच्या कुटुंबावर प्रेम केलं. पारनेर तालुक्यातील जनता या पुढे कोणत्याही दहशती खाली राहणार नाही. पारनेर तालुक्यातील जनतेच्या मागे विखे पाटील परिवार उभा आहे. विकासाच्या आधारावर आम्ही मते माघायला चाललो आहेत. तुतारी उमेदवारीचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय मी राहणार नाही, असे ठाम मत अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील (Ahmednagar Lok Sabha Constituency) महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी व्यक्त केले.

हे देखील वाचा: ‘संपदा पतसंस्था’ अपहार प्रकरणी वाफारेसह २२ जण दोषी

पनवेल मधील कामोठे परिसरात संवाद सभा (Sujay Vikhe Patil)

डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ पनवेल मधील कामोठे नगरी परिसरात परिवार संवाद सभेचे काल (रविवारी) आयोजन  करण्यात आले होते. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी आम्ही पारनेरकर, विजुभाऊ औटी मित्र परिवार व कोमोठे सांस्कृतिक युवा मंडळ आणि संदीप पाटील जनसेवा फाउंडेशनतर्फे परिवार संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी कामोठेकरांनी डॉ. सुजय विखे पाटील यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. हजारो नागरिकांतर्फे डॉ. सुजय विखे पाटील यांची मिरवणूक काढत त्यांचा सन्मान करण्यात आला.

नक्की वाचा: कर्जदाराची दोन कोटी रक्कम परस्पर वर्ग केली सावकाराच्या खात्यात

सुपा एमआयडीसीमध्ये दहशतीचे वातावरण (Sujay Vikhe Patil)

विजय औटी यांनी व्हिजन असलेला नेता जनतेला मिळणार असून, विखे पाटील कुटुंबीयांनी मागील 50 वर्षांपासून जनतेची सेवा केली असून डॉ. सुजय विखे पाटील, ही परंपरा अखंड चालवत आहेत. यामुळे जनता त्यांच्या पाठीशी उभी असून त्यांच्या चौथ्या पिढीला सत्तेत बसविले आहे. विरोधकांवर ताशरे ओढताना औटी यांनी सुपा एमआयडीसीमध्ये स्थानिकांना डावलून दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचे काम पारनेर मधील लोकप्रतिनिधी करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी यावेळी पारनेरकरांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आभार व्यक्त करत ही निवडणूक परिवर्तनाची असून दहशतवादी प्रवृत्ती संपवणारी आहे. यामुळे लोकांनी विचार करून मतदान करावे. विखे परिवार सदैव पारनेरकरांच्या पाठीशी आहे. मी केवळ विकासाच्या मुद्द्यावर मते मागणार असून येणाऱ्या काळात फक्त विकासाचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी पारनेर, नगर आणि नवी मुंबईतील सर्व भाजप आणि महायुती घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here