Sujay Vikhe Patil : विधानसभा निवडणुकीत महायुतीची ताकद दाखवा; सुजय विखेंचा कार्यकर्त्यांना संदेश

Sujay Vikhe Patil : विधानसभा निवडणुकीत महायुतीची ताकद दाखवा; सुजय विखेंचा कार्यकर्त्यांना संदेश

0
Sujay Vikhe Patil : विधानसभा निवडणुकीत महायुतीची ताकद दाखवा; सुजय विखेंचा कार्यकर्त्यांना संदेश
Sujay Vikhe Patil : विधानसभा निवडणुकीत महायुतीची ताकद दाखवा; सुजय विखेंचा कार्यकर्त्यांना संदेश

Sujay Vikhe Patil : नगर : माझ्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता रात्रीचा दिवस करून पळाला आहे. पराभव झाला असला तरी खचून जाऊ नका. आरोप प्रत्योरोपांमध्ये वेळ घालविण्यापेक्षा गावपातळीवर आजपासून कामाला सुरूवात करा. जिथे अन्याय होईल, तिथे तुमच्या पाठीशी खंबीरपणे मी उभा आहे. महायुतीची (Mahayuti) ताकद विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) दाखवून देण्यासाठी कटिबद्ध व्हा, असा संदेश डाॅ. सुजय विखे (Sujay Vikhe Patil) पाटील यांनी दिला.

नक्की वाचा : भारताचा पाकिस्तानवर सहा धावांनी दमदार विजय 

विखेंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून कृतज्ञता केली व्यक्त

निवडणूक निकालानंतर डाॅ. विखे पाटील यांनी महायुतीच्या सर्व पदाधिकरी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केला. जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, माजी महापौर बाबासाहेब वाकळे आदी उपस्थित हाेते. निवडणूक निकालाच्या विश्लेषणात न जाता आता पुन्हा नव्याने आपल्याला काम सुरू करायचे आहे. त्यामुळे परभवाने नाराज होऊ नका, असे भावनिक आवाहन करून डाॅ. विखे पाटील म्हणाले, निवडणुकीत पराभव का झाला याची कारण फार वेगळी आहेत. पण तरीही सहा लाखांचे मतदान देऊन जनतेने आपल्याला विश्वास दाखवला. आम्ही पराभव स्विकारला पण समोरच्यांना विजय पचवता येत नाही. पारनेरची घटना पाहाता आता यापुढे कोणाही कार्यकर्त्यावर हल्ला झाल्यास महायुतीच्या कार्यकर्त्यानी बांगड्या भरलेल्या नाहीत, अशा शब्दात त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

अवश्य वाचा : माेदींच्या तिसऱ्या टर्मची वाटचाल गाैरवशाली ठरणार; महसूलमंत्र्यांचा विश्वास

नगरच्या औद्योगिक वसाहतीचे काम महिनाभरात सुरू होईल

लोकसभा मतदार संघातील प्रत्येक गावात आपण निधी दिला आहे. विकास काम पूर्ण कशी होतील, याचा पाठपुरावा करा, यासाठी थेट संपर्क साधा. केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार आहे. विकास कामांना मोठी मदत होणार आहे. नगरच्या औद्योगिक वसाहतीचे काम महिनाभरात सुरू होईल, जी आश्वासन दिली, त्याची पूर्तता करण्यासाठी आपण कटिबद्ध राहणार असून कुठेही कमी पडणार नाही. कोणी काही चर्चा केल्यातरी २०२९ चा खासदार महायुतीचाच असेल आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीची ताकद विरोधकांना दाखवून देण्याचे आवाहन डाॅ. विखे पाटील यांनी केले.

Sujay Vikhe Patil
Sujay Vikhe Patil

जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी आपल्या भाषणात डॉ. विखे यांच्या पराभवाची कारण खूप वेगळी आहे. त्याचे विश्लेषण समोर आले आहे. काही गोष्टीचा खोटा प्रचार करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला. पराभवाचे दुःख असले, तरी नाउमेद न होता सर्वानी एकसंघपणे पुन्हा कार्यरत राहाण्याचे आवाहन त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here