Sujay Vikhe Patil : राहाता : अहमदनगर लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) पराभूत झालेले महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम (EVM) मायको कंट्रोलर तपासणीची मागणी केली आहे. ही मागणी सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निकालानुसार आणि निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केली असल्याची माहिती सुजय विखे पाटील यांनी शिर्डी येथे पत्रकार परिषदेत दिली. ही मागणी केवळ आमच्या कार्यकर्त्यांच्या आग्रही मागणीनुसार केली आहे, यातून कोणीही वेगळा अर्थ काढू नये, आम्हांला जनतेचा कौल मान्य आहे, अशी प्रतिक्रिया विखे पाटील यांनी यावेळी दिली.
नक्की वाचा: फेक नॅरेटिव्ह सेट करण्यात विरोधक यशस्वी : मेधा कुलकर्णी
काही केंद्रांवर कार्यकर्त्यांची तीव्र शंका
कोणत्याही उमेदवाराला निकाल लागल्यानंतर सात दिवसांच्या आत एकूण ईव्हीएम मशीनच्या ५ टक्के मशीनच्या मायक्रो कंट्रोलरची तपासणी करता येते. त्यामुळे ज्या केंद्रांवर कार्यकर्त्यांची शंका तीव्र होती, अशा ४० ठिकाणच्या ईव्हीएमच्या मायक्रो कंट्रोलर मशीनची तपासणीची मागणी रीतसर फी जीएसटी’सह भरून केली असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. निवडणुकीत जनतेने दिलेला कौल आपल्याला कालही मान्य होता आणि आजही मान्य आहे.
अवश्य वाचा : माझं लाेकसभेतलं पहिलं भाषण इंग्रजीतच : नीलेश लंके
यात कसलेही राजकारण अथवा वेगळा हेतू नाही (Sujay Vikhe Patil)
असे विखे पाटील यांनी सांगितले. केवळ काही ठिकाणच्या कार्यकर्त्यांना त्या-त्या ठिकाणी आलेले निकाल मान्य नव्हते. त्यामुळे ज्या ठिकणी कार्यकर्त्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या, अशा ठिकाणच्या ईव्हीएम मशीनच्या मायक्रो कंट्रोलरच्या तपासणीची माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या निकाल आणि निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केली आहे. यातून कोणीही वेगळा अर्थ काढू नये, अशी विनंती सुजय विखे पाटील यांनी यावेळी केली.