Sujay Vikhe Patil : सुजय विखे पाटलांचे जोरदार उपहासात्मक भाषण; दशक्रियेला बोलवा कावळ्या आधी मी हजर…

Sujay Vikhe Patil : सुजय विखे पाटलांचे जोरदार उपहासात्मक भाषण; दशक्रियेला बोलवा कावळ्या आधी मी हजर…

0
Sujay Vikhe Patil : सुजय विखे पाटलांचे जोरदार उपहासात्मक भाषण; दशक्रियेला बोलवा कावळ्या आधी मी हजर…
Sujay Vikhe Patil : सुजय विखे पाटलांचे जोरदार उपहासात्मक भाषण; दशक्रियेला बोलवा कावळ्या आधी मी हजर…

Sujay Vikhe Patil : नगर : लोकसभा निवडणुकीत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांचा अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून (Lok Sabha constituency) पराभव झाला. त्यानंतर त्यांनी काल (मंगळवारी) एका पतसंस्थेच्या वर्धापनदिन कार्यक्रमात जोरदार मार्मिक भाषण करत आगामी राजकारणातील भूमिकेचे संकेत दिले. पराभवातून मी शिकलो आहे. यापुढे दशक्रिया, वाढदिवस, जागरण-गोंधळ सारख्या खासगी कार्यक्रमांना उपस्थित राहणार. विकासकामापेक्षा जनसंपर्काला महत्त्व देणारेही लोक आहेत. दशक्रियेला बोलवा कावळ्या आधी मी हजर होईल, अशी वाक्यागणित उपहासात्मक टोलेबाजी करत त्यांनी आपल्या पुढील राजकीय (Political) भूमिकेचे संकेत दिले. या भाषणाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) जोरदार व्हायरल होत आहेत.

नक्की वाचा: संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे कर्जतमध्ये उत्साहात स्वागत

डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की,

मागील पाच वर्षांत मला बराच अनुभव आला आहे. मतदानाचा आणि विकासकामांचा काहीही संबंध राहिलेला नाही. जेवढी रोहित्रे दिली तेवढाच करंट लोक आपल्याला देतात, असा माझा अनुभव आहे. काळ बदलत चालला आहे. विचार बदलत चालले आहेत, वैचारिकता बदल चालली आहे. दुर्दैवाने मला जनतेला काय पाहिजे हे मला कळलेच नाही, आजही कळत नाही. तरी सुद्धा काही गोष्टी घेऊन आपण पुढे चालणे या शिवाय पर्याय नाही. आम्हाला ज्यांनी साथ दिली त्यांना बरोबर घेऊन चालावे लागेल नाही तर त्यांना कोणी वाली राहणार नाही, असे त्यांंनी स्पष्ट केले.

अवश्य वाचा: फायनान्स कंपनीच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

विखे पुढे म्हणाले, (Sujay Vikhe Patil)

पतसंस्थेच्या व्यवहार प्रक्रियेत विश्वास महत्त्वाचा असतो. विश्वासावर जीवन चालते. दुर्दैवाने मधल्या काही काळात विश्वास ठेवण्याची परंपरा कमी होत चालली आहे. कोणीही कोणावर विश्वास ठेवायला तयार नाही. मुलगा वडिलांवर विश्वास ठेवत नाही. कार्यकर्ते नेत्यावर विश्वास ठेवत नाही, अशा प्रक्रियेत राजकारण नव्हे तर समाज संपतो. एखाद्या चांगल्या काम करणाऱ्या सरपंचाच्या पराभवाने; सरपंच संपत नाही. मात्र, गाव संपत. त्या गोष्टीची जाणिव व्हायला वेळ निघून गेल्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. माझ्या बरोबर अनेक जण राजकारणात आले. ते माझ्या बरोबर विकासकामे करत फिरले. मी त्यांंना सांगत होतो, तुम्ही जेवढी विकासकामे करायला पळाल तेवढे विरोधक तुम्हाला पराभूत करण्यासाठी एकत्र येतील. मात्र, त्यांच्या पराभवानंतर ती अक्कल मला का आली नाही, हे मला कळेना. मी सल्ले दिले मात्र, त्याची अंमलबजावणी स्वतःवर केली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

आपण जेव्हा निवडणूक लढवितो तेव्हा आपल्या वाटते की समाजाला एखादी गोष्ट त्रास दायक वाटते. त्याच्या विरोधात कोण उभे राहणार. मात्र, निवडणुकीनंतर जाणिव झाली की, जनतेला एखादी गोष्ट मान्य असेल तर त्याच्या विरोधात आपण का जावे. बदललेले राजकारण ओळखण्यात मी अयशस्वी ठरलो. माणूस अनुभवाने शहाणा होतो. कमी वयात अनुभव आल्याने मी परमेश्वराचे आभार मानतो. मी आता ठरवलं आहे, सकाळी लवकर उठायचं. कुटुंबाला वेळ द्यायचा. लोकांना भेटायचं. लोकांची कामे झाली पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.

पराभवानंतर मी विचार केला, हळूहळू बाहेर पडलो. माणसाला त्याच्या कामापेक्षा त्याच्या कर्तृत्वाची किंमत मिळाली पाहिजे. चुकीच्या पद्धतीने बदलेल्या राजकारणापासून आपण सावध राहिले पाहिजे. वेळ निघून गेल्यावर ती पुन्हा कोणासाठीच परत आलेली नाही. माझ्याकडे आता वेळ असल्याने मी खासगी कार्यक्रमांना उपलब्ध आहे. मंत्री विखे पाटलांना काम व दौऱ्यांमुळे खासगी कार्यक्रमांना उपस्थित राहणे शक्य होत नाही. त्यामुळे अशा कार्यक्रमांना मी उपस्थित राहणार आहे. मी ठरविले आहे. वाढदिवसाला हजर राहणार. आता तुम्ही रोहित्र, रस्ते असे काही सांगू नका. दशक्रियाविधी असेल तर सांगा. कावळ्याच्या आधी सुजय विखे हजर होईल. फोन लावा गडी हजर राहील. लोकसभेला आमचे समोरचे मित्र होते ते पहाटे चार वाजता लंगर तोडायला गेले. आता तर हेच. जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला बोलावले नाही तर मी कारवाई करेल. लंगर तोडायला मी येणार, माझ्यावर विश्वास ठेवा. एकतर माणूस फिरू शकतो किंवा विकास कामे करू शकतो. त्यामुळे समतोल ठेवणे क्लिष्ट आहे. विकासकामे करून पाहिले. आता संपर्क ठेऊन पाहू. तुमचे पोट दुखत असले तरी फोन लावा. मी डॉक्टर सुद्धा आहे, असे त्यांनी सांगताच एकच हशा पिकला.

माझ्या पराभवाचे अनेकांना दुःख झाले. तुम्ही माझ्या प्रचारासाठी पळाले मात्र, यश मिळाले नाही. मात्र, कार्यकर्ते, संघटनेची ताकद दाखवली. महाराष्ट्रात जे वातावरण होते त्यात आपण विजयाच्या जवळ येऊन थांबलो. यात तुमच्या सर्वांचे कष्ट होते, अशी साथ कायम ठेवा. जनसामान्यांचे कल्याण करण्यासाठी आपण आहोत. सुजय विखे पराभवाने खचणारा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here