Sujay Vikhe Patil : सुजय विखे विधानसभा लढवणार?; कुणाला देणार आव्हान 

Sujay Vikhe Patil : सुजय विखे विधानसभा लढवणार?; कुणाला देणार आव्हान 

0
Sujay Vikhe Patil : सुजय विखे विधानसभा लढवणार?; कुणाला देणार आव्हान 
Sujay Vikhe Patil : सुजय विखे विधानसभा लढवणार?; कुणाला देणार आव्हान 

Sujay Vikhe Patil : नगर : माजी खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी आता विधानसभा निवडणुकीकडे (Assembly Elections) आपला मोर्चा वळवला आहे. संगमनेर  किंवा राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक (Election) लढण्याची त्यांची तयारी असून पक्षाकडे याबाबत इच्छा व्यक्त केली आहे, अशी माहिती सुजय विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत (Press Conference) दिली आहे.

नक्की वाचा: रिव्हॉल्वरचा धाक दाखवून ग्रामपंचायत सदस्याचे अपहरण करणारे आरोपी जेरबंद

विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी (Sujay Vikhe Patil)

महाविकास आघाडी आणि महायुतीकडून विधानसभेची जोरदार तयारी करण्यात येत आहे. आता सुजय विखेंनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवल्याने नगरमध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार असल्याची चर्चा आहे. सुजय विखे यांनी संगमनेर किंवा राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. याबाबत त्यांनी पक्षाकडे इच्छा देखील व्यक्त केली आहे.

अवश्य वाचा: संत सदगुरु गोदड महाराजांचा रथोत्सव उत्साहात साजरा

संगमनेरमधून लढल्यास थोरातांबरोबर सामना (Sujay Vikhe Patil)

सुजय विखे पाटील हे संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहिले तर त्याचा थेट सामना बाळासाहेब थोरात यांच्यात रंगू शकतो. संगमनेर विधानसभेत बाळासाहेब थोरात हे सध्या विद्यमान आमदार आहेत. तर सुजय विखे यांनी राहुरी विधानसभा लढवल्यास प्राजक्त तनपूरे विरूद्ध सुजय विखे अशी लढत होणार आहे. आता सुजय विखे यांना नेमकी कुठल्या मतदारसंघातून उमेदवारी मिळवणार? अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here