Sujay Vikhe Patil : धर्म आणि जातीच्या नावावर विष कालवणे सहन करणार नाही; डॉ. सुजय विखे पाटलांचा इशारा

Sujay Vikhe Patil : धर्म आणि जातीच्या नावावर विष कालवणे सहन करणार नाही; डॉ. सुजय विखे पाटलांचा इशारा

0
Sujay Vikhe Patil : धर्म आणि जातीच्या नावावर विष कालवणे सहन करणार नाही; डॉ. सुजय विखे पाटलांचा इशारा
Sujay Vikhe Patil : धर्म आणि जातीच्या नावावर विष कालवणे सहन करणार नाही; डॉ. सुजय विखे पाटलांचा इशारा

Sujay Vikhe Patil : नगर : मागील ७० वर्षात शिर्डी मतदारसंघातील (Shirdi Constituency) कोणत्याही जाती अथवा धर्माला संरक्षणाची गरज पडली नाही. मात्र, आज असं काय झालं की? प्रत्येकाला आपलं अस्तित्व धोक्यात वाटू लागलं आहे. महाराष्ट्र (Maharashtra) आणि शिर्डी मतदारसंघाबाहेर काय चालू आहे, त्याबद्दल मला काही माहीत नाही. परंतु, शिर्डी मतदारसंघात आपण सर्व जण एक आहोत. त्यामुळे धर्म आणि जातीच्या नावावर विष कालवणे सहन करणार नसल्याचा इशारा डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी दिला.

नक्की वाचा: मद्यधुंद पोलीस उपनिरीक्षकाकडून वृत्तपत्र छायाचित्रकारास मारहाण; पोलीस अधीक्षकांना निवेदन

युवक कार्यकर्त्याशी संवाद

संगमनेर तालुक्यातील आश्‍वी बुद्रुक येथे युवक कार्यकर्त्याशी संवाद साधताना माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील बोलत होते. अशोकराव जऱ्हाड, नवनाथ ताजणे, भीमा शिंदे, अनिल कंगणकर, विजय म्हसे, अनिल म्हसे, संजय गायकवाड, सुनील जऱ्हाड, अनिल जऱ्हाड, विशाल वाकचौरे आदी उपस्थित हाेते. 

अवश्य वाचा: मनसेच्या दोन गटात अमित ठाकरेंसमोरच वाद?

डॉ. विखे पाटील म्हणाले, (Sujay Vikhe Patil)

ज्या दारुड्याला घरात आणि गावात कोणी विचारत नाही. तो मोबाईलवर एखादे स्टेटस ठेवतो आणि आपण गाव बंद ठेवतो. आपण सुशिक्षित असूनही भरकटत चाललोय का? तुमचां शिक्षण घेऊन काय उपयोग झाला, असा सवाल डॉ. विखे यांनी उपस्थित करत डॉक्टर असून जर मी भेदभाव मिटवू शकलो नाही, तर माझ्या शिक्षणाचा काय उपयोग असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे मतदारसंघातील सामाजिक सलोखा बिघडणार नाही आणि मुलींची सुरक्षितता भंग होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन केले.

‘जनसेवा युवा मंच’बाबत माहिती देताना ते म्हणाले, या अँपचा उपयोग युवकांचे संघटन, बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये युवकांना रोजगाराच्या संधी, विविध अर्ज तसेच गणेश मंडळाची नोंदणी करण्यासाठी प्रामुख्याने उपयोग होणार आहे. १५ सप्टेंबर पर्यंत यांची नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन करताना नोंदणी करणारे युवक माझ्याबरोबर आयुष्यभर राहणार असल्याचे सांगितले. तसेच सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांनासाठी संघटनेत काम करणाऱ्या युवकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही डॉ. विखे यांनी दिली.

एकाचं घरातील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे महाराष्ट्रात दोन वेगवेगळे पक्ष चालवत असल्याचे सांगून कार्यकर्त्यानी आता एकमेकांच्या तक्रारी करण्यात वेळ न घालवता विविध योजना घरा-घरापर्यंत पोहचवाव्यात. ज्येष्ठ कार्यकर्त्यानी देखील मनाचा मोठेपणा दाखवून तरुण कार्यकर्त्याशी स्पर्धा न करण्याचा सल्ला दिला आहे. स्वं. बाळासाहेब विखे पाटील, इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी आणि राजीव गांधी यांसारख्या दिग्गज नेत्यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, आश्‍वी बुद्रुक येथे माझा पराभव झाल्याचा जल्लोष करण्यात आला. यांची खंत बोलून दाखवताना मला काम करण्यासाठी कोणत्याही पदाची गरज नसल्याचे डॉ. सुजय विखे म्हटले आहे.