Sujay Vikhe Patil : एमआयडीसी प्रकल्पात प्रत्येक घरातील व्यक्तीला राेजगार; सुजय विखेंनी व्यक्त केला विश्वास

Sujay Vikhe Patil : एमआयडीसी प्रकल्पात प्रत्येक घरातील व्यक्तीला राेजगार; सुजय विखेंनी व्यक्त केला विश्वास

0

Sujay Vikhe Patil : नगर : राहाता तालुक्यातील सावळीविहीर येथे एमआयडीसी (MIDC) प्रकल्पात प्रत्येक घरातील किमान एक व्यक्तीला रोजगार मिळणार आहे, असे डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी सांगितले. शेती महामंडळाच्या ५०० एकर जागेत एमआयडीसी निर्माण होत आहे. त्याचे प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. पुढील पाच वर्षांत मत मागायला येईल, तेव्हा सावळी विहीर येथील प्रत्येक घरातील व्यक्तीला या प्रकल्पातून रोजगार (Employment) मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नक्की वाचा: दुर्गामाता दौडीत नारीलाच नाकारले,संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

महिला बचत गटांना फूड प्रोसेसिंग युनिट वितरण

सावळीविहिर बुद्रुक येथे विविध विकासकामांचा प्रारंत्र मुख्यमंत्री वयोश्री योजना नोंदणी सोहळा, तसेच महिला बचत गटांना फूड प्रोसेसिंग युनिट वितरण कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या सोहळ्याला मोठ्या संख्येने ग्रामस्थ, शेतकरी आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. सुजय विखे पाटील यांनी शिर्डी मतदारसंघातील विकासाच्या संदर्भात बोलताना सांगितले की, ”राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली, येथे मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असून खंडकरी शेतकऱ्यांचे जमिनींचे वर्गीकरण आणि इतर तांत्रिक बाबी सोडवून, २५० कोटी रुपयांची बचत शेतकऱ्यांसाठी करण्यात आली आहे. मतदारसंघातील खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनीचा आणि संस्थानातील कंत्राटी कामगारांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे अखेर मार्गी लागल्या आहे. 

Sujay Vikhe Patil : एमआयडीसी प्रकल्पात प्रत्येक घरातील व्यक्तीला राेजगार; सुजय विखेंनी व्यक्त केला विश्वास
Sujay Vikhe Patil : एमआयडीसी प्रकल्पात प्रत्येक घरातील व्यक्तीला राेजगार; सुजय विखेंनी व्यक्त केला विश्वास

अवश्य वाचा: पुण्यात दोन चिमुरड्या मुलींवर स्कुल बस ड्रायव्हरकडून लैंगिक अत्याचार

सुजय विखे पाटील यांच्या आश्वासनांवर समाधान (Sujay Vikhe Patil)

सोमय्या औद्योगिक वसाहतीतील प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. या संदर्भात आराखडे तयार आहेत आणि लवकरच या वसाहतीतील समस्या सोडवल्या जातील. तसेच, या वसाहतीत महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील. एमआयडीसी व पशुवैद्यकीय दवाखान्यातील आवश्यक वस्तूंसाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार होणाऱ्या कापडी पिशव्या आणि इतर या कार्यक्रमात उपस्थितांनी डॉ. सुजय विखे पाटील यांच्या आश्वासनांवर समाधान व्यक्त केले. 

Sujay Vikhe Patil : एमआयडीसी प्रकल्पात प्रत्येक घरातील व्यक्तीला राेजगार; सुजय विखेंनी व्यक्त केला विश्वास
Sujay Vikhe Patil : एमआयडीसी प्रकल्पात प्रत्येक घरातील व्यक्तीला राेजगार; सुजय विखेंनी व्यक्त केला विश्वास

विरोधकांवर टीका (Sujay Vikhe Patil)

विरोधकांवर जोरदार टीका करताना डाॅ. विखे पाटील म्हणाले, “जे माजी महसूल मंत्री सात वर्षे पदावर होते, त्यांना गरिबांची आठवण का झाली नाही? त्यांनी या जनतेसाठी एक तरी काम केले आहे का? आता निवडणुका जवळ आल्या की हे नेते समाजात फिरताना दिसतात. परंतु, विखे पाटील परिवार नेहमीच लोकांच्या संपर्कात असतो. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असतो.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here