Sujay Vikhe Patil : मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणारे यंदा आमदारसुध्दा होऊ शकणार नाहीत : डॉ. सुजय विखे पाटील

Sujay Vikhe Patil : मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणारे यंदा आमदारसुध्दा होऊ शकणार नाहीत : डॉ. सुजय विखे पाटील 

0
Sujay Vikhe Patil : मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणारे यंदा आमदारसुध्दा होऊ शकणार नाहीत : डॉ. सुजय विखे पाटील 
Sujay Vikhe Patil : मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणारे यंदा आमदारसुध्दा होऊ शकणार नाहीत : डॉ. सुजय विखे पाटील 

Sujay Vikhe Patil : संगमनेर : आजची सभा हा फक्त ट्रेलर आहे. या तालुक्यात परीवर्तन करण्यासाठी महिलांचा वाटा खूप मोठा असणार आहे. युवकांनी सुध्दा मागे न राहाता तालुक्यातील दहशत झुगारून परिवर्तनासाठी पुढे आले पाहिजे. तालुक्यातील ठेकेदारी संस्कृती तुमचा विकास करू शकणार नाही, अशा शब्दात डाॅ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्री (Chief Minister) होण्याचे स्वप्न पाहणारे यंदा आमदारसुध्दा (MLA) होऊ शकणार नसल्याचा टोला त्यांनी लगावला.

नक्की वाचा: आदर्श आचारसंहिता लागू होण्याच्या ४८ तासात जिल्ह्यातील २४ हजार ९६९ जाहिराती काढल्या

४० वर्षाच्या कार्यपध्दतीवर जोरदार टीका

तळेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या युवा संकल्प मेळाव्यात डाॅ. सुजय विखे पाटील यांनी थोरातांच्या ४० वर्षाच्या कार्यपध्दतीवर जोरदार टीका केली. वर्षानुवर्ष या भागातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवू न शकलेले कोणत्या विकासाची भाषा करतात, असा प्रश्न करून या तालुक्यात फक्त नातेवाईकांसाठी राजकारण झाले. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत परिवर्तन करायचे असून दोन दिवसात पक्षाचा निर्णय होवून संगमनेर विधानसभा मतदारसंघाची जागा भाजपाच्या वाट्याला येईल, असा विश्वास विखे यांनी व्यक्त केला.

अवश्य वाचा: बिबट प्रवण क्षेत्रात ऊसतोड करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन

डॉ. विखे म्हणाले, (Sujay Vikhe Patil)

४० वर्षे तालुक्याला मोठी पद मिळाली. पण निधी आणता आला नाही. नामदार विखे पाटील यांच्या माध्यमातून तळेगावला ४४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. निळवंडे धरणाचे पाणी आले.अनेक वर्ष फक्त विखे पाटील परिवारावर टीका केली. पण साईबाबांचे आशीर्वादाने विखे पाटील कुटुंबातील मुलगाच जिल्ह्याचा पालकमंत्री झाला आणि निळवंड्याचे  पाणी आणून दाखवले. आता भोजापूर चारीचे पाणी सुध्दा विखे पाटीलच आणून दाखवतील, असा दावा त्यांनी करताना पुढची ४० वर्षे तालुक्यातील युवकांच्या उज्ज्वल भवितव्याची असतील अशी ग्वाही त्यांनी दिली.


डाॅ. सुजय विखेंना तिकीट नाकारले अशा बातम्या जाणीपूर्वक पेरल्या. कोणत्या सूत्रांची माहीती आहे, तुम्हाला माहीत आहे. यशोधनच्या सूत्रांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करून संगमनेरचा मतदारसंघ भाजपला मिळणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.