Sujay Vikhe Patil : संगमनेर : तालुक्याची विकास प्रक्रिया साध्य करण्यासाठी यापुढे आम्ही सेवक म्हणून काम करणार आहोत. कोणीच साहेब नाही, तर सर्वसामान्य जनताच आमदार (MLA) आहे. या तालुक्यातील प्रलंबित असणारे अनेक प्रश्न आपल्याला सर्वांना पाच वर्षांमध्ये सोडवायचे आहे. केवळ संगमनेरात नव्हे तर राज्यात परिवर्तन झालेले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री (Chief Minister) पदाचा शपथविधी झाल्या नंतर मुख्यमंत्र्यांना भेटून पठार भागावर उपसा जलसिंचन योजना मंजूर करून आणण्याची ग्वाही माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी दिली.
अवश्य वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीचा दणदणीत विजय; विखे ठरले किंगमेकर
नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांच्या विजयाचा जल्लोष
संगमनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या पासून नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला. त्यानंतर मालपाणी लॉन्स येथे डॉ सुजय विखे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी ते बोलत होते.
डॉ. विखे म्हणाले की, संगमनेर विधानसभेचा आमदार खताळ नसून आपण सर्व जण असणार सगळ्यांना न्याय मिळणार आहे. कोणीही आमदार म्हणायचे नाही. भाऊ म्हणून हाक मारायची आहे. आरोग्य, पाणी हे सर्व देण्याची जबाबदारी आपली आहे. पुढे जिल्हा परिषद निवडणुका आहे. ही सत्ता सर्व सामान्य माणसांची आहे. प्रत्येक वाडीवस्तीवर आपल्याला पोहोचायचे आहे. जो व्यक्ती त्याच्या गावात प्रश्न सोडवेल त्याला यापुढे संधी दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
नक्की वाचा : ‘आमचं आम्ही बघू’,मुख्यमंत्रिपदाबाबत अजित पवारांचं वक्तव्य
विखे पुढे म्हणाले की (Sujay Vikhe Patil)
संगमनेर तालुक्यातील अनेक वर्षांपासून जे प्रलंबित प्रश्न मार्गी लावायचे आहेत. जनसेवा मंच या अॅपच्या माध्यमातून आपण सर्व प्रश्न सोडवणार आहोत. कोणत्याही नेत्यापुढे अर्ज घेवून फिरावे लागणार नाही. आता अनेक लोक आपल्याला दबावात घेण्याचा प्रयत्न करतील पण आता घाबरायचे कारण नाही. गोरगरीब जनतेचा आवाज आता या ठिकाणी ऐकला जाणार आहे. कोणाला धमकवणे, अपशब्द वापरणे हे आपल्या करायचे नाही. आता आपल्या आत्मसन्मानाने काम करायचे आहे. चाळीस वर्षाचा राग तुम्ही सर्वसामान्यांनी मतपेटीतून दाखवला आहे. आपली वाहने जाळली, लोकांना मारले पण आता आपल्याला विकासाचे राजकारण करायचे आहे. तळेगाव, पठार भागाचा पाणी प्रश्न सोडवायचा आहे. आपल्या मनातील राग शांत करून आता आपल्याला विकास करून दाखवायचा आहे, असे त्यांनी सांगितले.
टायगर अभी जिंदा है
आजची सभा आमची शेवटची आहे. तुम्ही देखील पराभव मान्य करावा मात्र, तुम्ही इथून पुढे आमच्या एकाही माणसाला हात लावला तर टायगर अभी जिंदा है. वाघ जेव्हा शांत होतो तेव्हा कोणी खडे मारायचे नाही. मात्र, वाघ दबक्या पावलाने पुढे जावून काय करतो हे तुम्ही सर्वांनी पाहिले आहे. माझ्यात आणि तुमच्यात संगमनेर मधील कोणताच पुढारी येणार नाही याचा तुम्हाला मी विश्वास देतो. तुमच्या विश्वासाला कधीच मी तडा जावून देणार नाही असा शब्द त्यांनी दिला.
नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ म्हणाले की, जनसेवेचा घेतल्याने आज माझ्या सारख्या सर्व सामान्य माणसावर जनतेने विश्वास टाकला त्यामुळे मी आज निवडून आलो. ६०० कोटी रुपयांची विकास कामे महायुती सरकारने केली आहे. ज्यांना ४० वर्षांत पाणी प्रश्न सोडवता आला नाही. त्याची दहशत वाढली होती. मात्र, ही दहशत मोडण्याचे काम आपण सर्वांनी केले आहे. हा विजय लाडक्या बहिणी, शेतकरी यांच्यामुळे झाला आहे. राधाकृष्ण विखे पाटील व डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून कामे करायची आहे. पाणी आणि रोजगाराचा प्रश्न सोडवणार आहे. माझ्या बरोबर दिवस रात्र सर्वसामान्य माणसांनी काम केले ते कधीही विसरू शकणार नाही. भविष्यात संगमनेर तालुका विकासाभिमुख आणि भयमुक्त करायचा आहे, असे त्यांनी सांगितले.