Sujay Vikhe Patil : नगर : “दुर्दैवाने, मी राजकारणातील (Politics) अभिनयगिरीत अपयशी ठरलो, पण प्रामाणिकपणे विकासकामे केली आणि करत राहीन. मला नाकारले गेले तरीही, माझी सेवाव्रताची भूमिका कायम राहील”, असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी केले.
नक्की वाचा : कर्जतमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात
भव्य सत्कार समारंभाचे आयोजन
अकोळनेर येथे डॉ. सुजय विखे पाटील, आ. शिवाजीराव कर्डिले आणि आ. काशिनाथ दाते, आमदार विक्रम पाचपुते यांचा भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
अवश्य वाचा : अहिल्यानगरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चषक कराटे स्पर्धा : सचिन जाधव
यावेळी डॉ. विखे पाटील म्हणाले, (Sujay Vikhe Patil)
“पारनेर विधानसभा मतदारसंघातील सत्तांतरामुळे तालुका सुरक्षित राहिला आहे. बीड जिल्ह्यात जे घडले, ते नगर जिल्ह्यात टळले. यासाठी मी पारनेरमधील महिलांसह समस्त जनतेचा मनापासून आभारी आहे.” असे मत मांडून त्यांनी सत्तांतर समाजहितासाठी कसे गरजेचे होते आणि त्यासाठी नागरिकांनी दिलेला कौल कसा परिणामकारक ठरेल यावर भाष्य केले.
साकळाई योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठ्याचा निर्धार
डॉ. सुजय विखे पाटील यांनी साकळाई योजनेच्या अंतर्गत अकोळनेरला पाणीपुरवठा करण्याचा निर्धार देखील यावेळी बोलून दाखवला. ते म्हणाले, “नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना जलसंपदा मंत्रीपद मिळाल्याचा जिरायत भागाला मोठा फायदा होणार आहे. निश्चितच परिसरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागेल व आमदार शिवाजीराव कर्डिले आणि काशिनाथ दाते यांच्या सहकार्याने पाणीपुरवठा लवकरच पूर्ण होईल आणि समस्त शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न निश्चितच मार्गी लागेल”, असे स्पष्ट केले.