
Sujay Vikhe Patil : राहाता : राहाता शहराचा (Rahata City) विविध विकासकामांच्या माध्यमातून कायापालट करायचा आहे. शहराला रोल मॉडेल सिटी बनवण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी केला आहे. त्या अनुषंगाने जपानी तंत्रज्ञानाच्या साह्याने सात कोटी रुपये खर्चाचा आधुनिक अप्पर वॉटर बाजारतळ उभारला जात आहे. त्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी निधीची तरतूद सुद्धा केली असून प्रत्यक्ष कामास लवकरच प्रारंभ हाेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नक्की वाचा : भारताने रचला इतिहास; तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषकाचे जेतेपद
नगरपरिषदेचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित
नेतृत्वाने शहराला रोल मॉडेल बनवण्याचा केलेला संकल्पास साथ म्हणून राहाता नगर परिषदेचे नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर व सर्व नगरसेवक ॲक्शन मोडवर आले आहे. अप्पर वॉटर बाजारतळ बनवले जाणाऱ्या कात नाल्याच्या ठिकाणी नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांच्या पुढाकारातून सर्व पदाधिकारी, मुख्याधिकारी व सफाई कामगार व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छता अभियान सुरू केले आहे. शनिवार (दि. ७) रोजी सकाळी सहा वाजताच नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर, उपनगराध्यक्ष डॉ. विजय सदाफळ, मुख्याधिकारी वैभव लोंढे, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, नगरसेवक प्रवीण सदाफळ, नितीन गाडेकर, माजी नगरसेवक भीमराज निकाळे, विजय गिधाड, सुरेश माळी, बाळासाहेब सदाफळ, सुयोग शेळके, प्रदीप बनकर आणि नगरपरिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
50 वर्षांचे नियोजन करुन आराखडा तयार (Sujay Vikhe Patil)
या सर्वांनी हाती झाडू फावडे व इतर साहित्य घेऊन येथे स्वच्छता अभियान राबविले त्याचबरोबर जेसीबीच्या साह्याने घाण दूर करण्याचे काम सुरू केले आहे. राहाता शहरात जपानी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आधुनिक ‘अप्पर वॉटर’ बाजारतळ उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार होत आहे. सुमारे 7 कोटी रुपये खर्चून आणि हायटेक बाजारतळ उभारला जाणार असून, राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे उपाध्यक्ष डॉ सुजय विखे पाटील यांच्या दूरदृष्टीतून हा प्रकल्प होत आहे.
राहाता शहराच्या वैभवात भर घालणारा हा प्रकल्प महाराष्ट्रात प्रथमच होत असून त्याचा मान राहाता शहराला मिळाला असल्याचे नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांनी सांगितले. यावेळी ते म्हणाले राहाता शहराला विकासाच्या दूरदृष्टीतून रोल मॉडेल बनवण्यासाठी सुजय विखे पाटील यांनी निर्धार केला आहे त्या निर्धाराला साथ म्हणून आम्ही सर्व नगरपरिषद पदाधिकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कात नाल्यात स्वच्छता अभियान राबवले आहे. सुजय विखे पाटील यांच्या संकल्पना व दूरदृष्टीतून आगामी काळात राहता शहराचा विकासात्मक दृष्ट्या खूप मोठा कायापालट होणार आहे.
राज्यातील अप्पर वॉटर बाजार तळाचा पहिला प्रयोग
राहाता शहराचा वैशिष्ट्यपूर्ण व झपाट्याने विकास साधताना शहराचे विकासात व वैभवात भर घालण्यासाठी नवनवीन प्रकल्प उभारले जात आहे. राहात्यातील आठवडे बाजारचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चेत होता. हा बाजार विरभद्र मंदीरासमोरील मैदानात भरत असल्याने, पसिररातील शाँपिंग काँम्प्लेक्समधील व्यापाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. शिवाय हे मैदान बाजारसाठी कमी पडत असल्याने शेतकरी व व्यापारी नगर-मनमाड महामार्ग व साकुरी रस्त्याच्या कडेला बसत होते. त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण होत होती.
हिच समस्या सोडविण्यासाठी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील यांनी पुढाकार घेतलाय. कातनाला अंडरग्राऊंड होणार असल्याने सुमारे एक ते दीड एकर जागा बाजार तळासाठी वापरायला मिळते. या कातनाल्याच्या पुराचे भविष्यातील 50 वर्षांचे नियोजन करुन आराखडा तयार केला आहे. राज्यातील पहिला प्रयोग अप्पर वॉटर बाजार तळाचा असून यामुळे वीरभद्र मंदिरासमोरील प्रांगण तसेच गाळेधारक मोकळा श्वास घेतील असा विश्वास यावेळी नगराध्यक्ष डॉ . स्वाधीन गाडेकर यांनी व्यक्त केला.


