Sujay Vikhe Patil : नगर : नगर तालुक्यातील वडगावगुप्ता येथील शासकीय जमीन औद्योगिक वसाहतीच्या (Industrial estate) विस्तारीकरणासाठी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकाने घेतला आहे, त्यामुळे नगरमध्ये लवकरच एमआयडीसीची (MIDC) उभारणी हाेऊन तरुणांना राेजगाराची उपलब्धता हाेणार आहे, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी दिली.
हे देखील वाचा : शनिशिंगणापूर देवस्थानमधील भ्रष्टाचाराची चौकशी होणार ; शिंदे फडणवीस सरकारची घोषणा
नगर जिल्ह्यातील औद्योगिक विकासाकरिता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. त्याकरिता शिर्डी आणि वडगाव गुप्ता येथे जमीन उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी पाठपुरावा सुरू केला होता. शिर्डी येथील औद्योगिक वसाहतीकरिता शेती महामंडळाच्या जमिनी उपलब्ध करून देण्यास राज्य मंत्रिमंडळाने यापूर्वीच निर्णय घेतला होता.
नक्की वाचा : मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका; मनाेज जरांगे पाटलांचा पुन्हा सरकारला इशारा
नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथील महाराष्ट्र शासनाची ६०० एकर म्हणजेच सुमारे २२५ हेक्टर आर जमीन फेज-२ साठी विनामूल्य वर्ग करण्याच्या प्रस्तावास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे राज्यात ही पहिलीच एमआयडीसी अशी आहे, ज्या एमआयडीसीसाठी शेतकरी तसेच खासगी जमीन संपादित केली गेली नाही. नगर जिल्ह्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल, तर औद्योगिक वसाहतीचा विस्तार होणे आवश्यक होते. महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर या सर्व निर्णयाला गती मिळाली. राज्य सरकारने औद्योगिक विकासाकरिता वडगाव गुप्ता येथे एमआयडीसीसाठी विनामूल्य जागा उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली. यामुळे मोठे उद्योग जिल्ह्यात येतील, असा विश्वास खासदार विखे पाटील यांनी व्यक्त केला. औद्योगिक वसाहतीच्या विस्ताराकरिता खासदार डॉ. सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.