नगर : पंजाबमध्ये (Panjab) एक धक्कादायक घटना घडली आहे. पंजाबमधील अमृतसर (Amrutsar) येथे सुवर्ण मंदिराच्या (Golden Temple) प्रवेशद्वारावर माजी उपमुख्यमंत्री व शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर एका व्यक्तीने गोळीबार (Firing) केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात सुखबीर सिंग बादल हे थोडक्यात बचावलेत.दरम्यान या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. या गोळीबाराच्या घटनेनंतर उपस्थित लोकांनी गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले. मात्र हा गोळीबार का करण्यात आला याबद्दल माहिती अजून समोर आलेली नाही.
नक्की वाचा : ‘एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी’-रोहित पवार
व्हायरल व्हिडिओत नेमकं काय ?(Sukhbir Singh Badal Firing)
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये निळ्या रंगाचा सेवादारांचा पोशाख घातलेले बादल त्यांच्या व्हील चेअरवर बसललेले दिसत आहेत.सोमवारी (ता.२) बादल यांना ‘अकाल तख्त’कडून धार्मिक शिक्षा देण्यात आली आहे. त्यामुळे पाय फ्रॅक्चर असलले बादल हे व्हील चेअरवर बसून सुवर्ण मंदिराबाहेर सेवा देत होते. या घटनेबद्दल पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे नाव नारायण सिंग चौरा असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या हल्ल्यामागील कारण अजून समजू शकलेले नाही.
अवश्य वाचा : ‘गरज सरो वैद्य मरो,हीच भाजपची भूमिका’;बच्चू कडूंचा प्रहार
बादल यांना काय शिक्षा झाली ? (Sukhbir Singh Badal Firing)
पंजाबमधील शिरोमणी अकाली दल आणि पक्षाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांच्यावर गंभीर आरोप करत ‘अकाल तख्त’चे जथेदार ग्यानी रघबीर सिंग यांनी सोमवारी बादल आणि इतर वरिष्ठ नेत्यांना ‘धार्मिक शिक्षा सुनावली होती. या शिक्षेचा एक भाग म्हणून, बादल आणि २०१५ पासून राज्यातील मंत्र्यांसह अकाली दलाच्या ‘कोअर कमिटी’ सदस्यांना शौचालये स्वच्छ करणे, लंगर मध्ये सेवा करणे, नितनेम (दररोज शीख प्रार्थना) करणे आणि सुखमनी साहिबचे पठण करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र आरोग्याच्या तक्रारींमुळे सुखबीर बादल आणि सुखदेव सिंग धिंडसा यांना गुरूंच्या निवासस्थानी दोन दिवस द्वारपाल म्हणून काम करण्यास, पारंपरिक सेवक पोशाख घालून भाले धारण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बादल हे तेव्हापासून सेवादार म्हणून सुवर्णमंदिरात सेवा देत आहेत. ही सेवा देत असतानाच ही घटना घडली आहे.