Summer heat : नगर : राज्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्याचे चित्र आहे. सातत्याने हवामानात बदल (Climate Change) हाेत आहे. कुठं उन्हाचा चटका (Summer heat) जाणवत आहे, तर कुठं ढगाळ वातावरण आहे. मुंबईसह (Mumbai) कोकण वगळता महाराष्ट्रात तापमानाचा पारा हा ४० ते ४२ डिग्री से. राहण्याची शक्यता हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
हे देखील वाचा : वसंत मोरेंची वाटचाल ‘वंचित’च्या दिशेने; प्रकाश आंबेडकरांची घेतली भेट
ढगाळ वातावरणाची शक्यता (Summer heat)
ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार ३० मार्चला एक दिवस मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रात केवळ ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. ३१ मार्चला पुन्हा राज्यातील तापमानाचा पारा वाढणार असल्याचे खुळे म्हणाले.
नक्की वाचा: नवनीत राणांना पाडणार; बच्चू कडूंनी केला निर्धार
कमाल तापमानात वाढ (Summer heat)
मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातील मराठवाडा व लगतच्या विदर्भातील जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक अहमदनगर अशा काही जिल्ह्यात कमाल तापमानात वाढ होणार आहे. दिवसभर बसणारे उन्हाचे चटके आणि त्यातच रात्री वाढत जाणाऱ्या उकाड्यामुळे नागरिक वैतागले आहेत.