नगर : उन्हामुळे सध्या घराबाहेर पडणे देखील मुश्किल होत असताना राज्याच्या बहुतांश भागात देखील उष्णतेच्या झळा (Hot Flashes) तीव्र होत असताना दिसत आहेत. कोरड्या हवामानामुळे त्यात आणखी वाढ झालीय. अवकाळी पावसाने राज्यात विश्रांती घेतली आहे. होळीनंतर तापमानात वाढ (Rise In tempreture) होण्यास सुरुवात होते. यावेळी मात्र होळीच्या आधीपासूनच तापमानाच्या झळा जाणवायला लागल्या आहेत. त्यामुळे होळीनंतर त्यात आणखी वाढ होणार हे निश्चित झाले.
नक्की वाचा : उज्जैन च्या महाकाल मंदिरात आगीचा भडका;पुजाऱ्यांसह अनेक जण होरपळले
राज्यात तापमानवाढीला सुरुवात (Summer Heat Update)
विदर्भासह मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यामध्ये ढगाळ वातावरण आहे. मात्र तरीही त्याचा फारसा परिणाम जाणवत नाही. दरम्यान, हवामान खात्याच्या माहितीनुसार, सध्या राज्यात तापमानवाढीला सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवसांसाठी ती सुरुच राहणार आहे. दुपारच्या वेळी अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटांची तीव्रता अधिक प्रकर्षाने जाणवणार आहे.
हेही पहा : राहुरीत बिबट्याचा थरार; वन विभागाचे तीन कर्मचारी गंभीर जखमी
मराठवाड्यात तापमान ३७ अंश सेल्सिअसच्या घरात (Summer Heat Update)
हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी होणार असून, हवामान कोरडे राहणार आहे. विदर्भातील तीन जिल्ह्यात आताच तापमानाने चाळीशी ओलांडली आहे, तर अनेक जिल्ह्यात तापमान ४० अंश सेल्सिअसच्या जवळपास आहे. थोड्याफार फरकाने ते कमीअधिक होऊ शकते. तर मराठवाड्यात देखील तापमान ३७ अंश सेल्सिअसच्या घरात राहणार असून, आठवड्याच्या शेवटी मात्र तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कोकणासुद्धा तापमान वाढ पाहायला मिळू शकते. त्यामुळे घराबाहेर पडताना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.