Sunetra Pawar:उपमुख्यमंत्रीपदानंतर आता सुनेत्रा पवार यांच्यावर ‘ही’ महत्त्वाची जबाबदारी

0
Sunetra Pawar:उपमुख्यमंत्रीपदानंतर आता सुनेत्रा पवार यांच्यावर 'ही' महत्त्वाची जबाबदारी
Sunetra Pawar:उपमुख्यमंत्रीपदानंतर आता सुनेत्रा पवार यांच्यावर 'ही' महत्त्वाची जबाबदारी

Sunetra Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाती निधनानंतर (Accidental Death) रिक्त झालेल्या पदांवर अखेर राज्य सरकारने महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर (Appointments Announced) केल्या आहेत. त्यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar)यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आता त्यांच्याकडे पुणे (Pune) आणि बीड (Beed) या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी (The responsibility of the Guardian Minister’s post) सोपवण्यात आली आहे. राज्य सरकारकडून याबाबतचा शासन निर्णय देखील जारी करण्यात आला आहे.

नक्की वाचा: मोठी बातमी!पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड  

२८ जानेवारी २०२६ ला मुंबईवरून बारामतीकडे विमानाने प्रवास करत असताना विमानाचा अपघात झाल्याने अजित पवार यांचे निधन झाले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. त्यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. मात्र, प्रशासकीय आणि राजकीय स्थैर्य राखण्यासाठी राज्य सरकारने तातडीने निर्णय घेत सुनेत्रा पवार यांना मंत्रिमंडळात स्थान दिले. आता त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे.

अवश्य वाचा: साई भक्तांना दिलासा!साईबाबांच्या मूर्तीबाबतचा अहवालात ‘या’ गोष्टी आल्या समोर   

सुनेत्रा पवार आता बीड व पुण्याच्या पालकमंत्री (Sunetra Pawar)

अजित पवार हे पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सक्रिय होते, तर बीड जिल्ह्याच्या राजकारणातही त्यांचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या निधनानंतर हे दोन्ही जिल्हे कोणाकडे जाणार? याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अखेर राज्य सरकारने एक अधिकृत परिपत्रक जारी करून या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. सुनेत्रा पवार आता पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाची आणि प्रशासनाची सूत्रे हाती घेणार आहेत.

सुनेत्रा यांच्यासमोर पदासोबतच आव्हाने आणि जबाबदारी (Sunetra Pawar)

सुनेत्रा पवार यांच्यासमोर आता अजित पवारांचा वारसा पुढे नेण्याचे मोठे आव्हान आहे. पुण्याचा विस्तार आणि बीडमधील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांना प्रशासकीय कसब वापरावे लागणार आहे. एकाच वेळी दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी मिळाल्याने त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.