Sunil Tatkare : नगर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) माध्यमातून आपल्या विरोधात अपप्रचार झाला. तो कसा अयोग्य आहे, हे सांगण्याची वेळ आपल्यावर आली आहे. प्रत्येक निवडणूक वेगळ्या मुद्द्यावर होत असते. राज्यात स्थानिक स्वराज्य महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या नाही म्हणून लोकसभेची निवडणूक ही ग्रामपंचायत सारखी झाली. निवडणुकीमध्ये पक्षाला यश-अपयश येत असते. मात्र, नेहमीच लोकांच्या मनात दिशाभूल करता येत नाही. महाराष्ट्र (Maharashtra) हे हुशार राज्य आहे. त्यामुळे काम करणाऱ्याच्या पाठीमागे ते नक्कीच उभे राहत असतात, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार (Ajit Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी केले.
नक्की वाचा: “मी हिरो झालेलं कुणाला कसं आवडेल?”; पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा नगर दक्षिण पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यात सुनील तटकरे बोलत होते. यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, आमदार संग्राम जगताप, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नहाटा, माजी उपमहापौर गणेश भोसले, अविनाश घुले, कुमार वाकळे, दत्ता पानसरे, प्रा. माणिक विधाते, अभिजित खोसे, महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे, राजेंद्र नागवडे आदी उपस्थित होते.
अवश्य वाचा : पोलीस भरतीसाठी बुधवारपासून मैदानी चाचणी सुरू; या रस्त्यावर राहणार एकेरी वाहतूक
सुनील तटकरे म्हणाले, (Sunil Tatkare)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देश पातळीवर एनडीए घटक पक्षांमध्ये मानसन्मान मिळत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी शेवटच्या घटकापर्यंत काम करावे. नगर जिल्हा सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडीवर असून याचा आदर्श देशपातळीवर देखील घेतला जातो, आमदार संग्राम जगताप हे जमिनीवर पाय ठेवून काम करत असल्यामुळेच त्यांच्या कामाला यश येत असते. कार्यकर्त्यांनी त्यांनी केलेली विकास कामे जनतेपर्यंत घेऊन जावी व त्यांच्या निवडणुकीमध्ये मतधिक्याचे अर्धशतक गाठावे, असे आवाहन त्यांनी केले.
संग्राम जगताप म्हणाले की, विधानसभा निवडणुकीमध्ये २०१९ प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार मोठ्या संख्येने निवडून येतील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यांमध्ये विविध भागाच्या विकासासाठी मोठा निधी दिला. कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये राहून चांगले काम उभे करावे. नगर शहराच्या विकासासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. विकासाची कामे सुरू आहेत. कार्यकर्त्यांनी आघाडी महायुती याकडे लक्ष न देता पक्षाची सूचना येईल त्याप्रमाणे काम करावे. निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली जावी, असे त्यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी कार्यक्रमाची प्रास्तविक केले. शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी आभार मानले