Sunita Bhangre : सुनीता भांगरे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

Sunita Bhangre : सुनीता भांगरे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

0
Sunita Bhangre : सुनीता भांगरे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
Sunita Bhangre : सुनीता भांगरे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

Sunita Bhangre : अकोले : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी घोषित केल्याप्रमाणे जिल्ह्यातील ऑपरेशन लोटसला अकोले तालुक्यातून सुरूवात झाली असून, अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा सुनीता भांगरे (Sunita Bhangre) यांच्यासह कार्यकर्त्यांचा भाजप (BJP) प्रवेश घडवून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे रणशिंगच फुंकले आहे.

Sunita Bhangre : सुनीता भांगरे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
Sunita Bhangre : सुनीता भांगरे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

नक्की वाचा : प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत ११ नोव्हेंबरला; महापालिकेचा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

राजकीय धक्कातंत्राला सुरूवात

दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमाच्या निमित्ताने संगमनेरात मंत्री विखे पाटील यांनी जिल्ह्यातील असंख्य पदाधिकारी आणि भाजपमध्ये येण्यास उत्सुक असल्याचे संकेत दिले होते. लवकरच आॅपरेशन लोटस होणार असे सूचक वक्तव्य करून एकप्रकारे राजकीय धक्कातंत्राचे संकेत दिले होते. काही दिवसांंपूर्वी माजी आमदार वैभव पिचड, सुनीता भांगरे यांनी मंत्री विखे पाटील यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. पिचड आणि भांगरे यांच्यात मंत्री विखे पाटील यांनी योग्य समन्वय साधून अकोले तालुक्यातूनच राजकीय धक्कातंत्राला सुरूवात केली आहे.

Sunita Bhangre : सुनीता भांगरे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
Sunita Bhangre : सुनीता भांगरे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

अवश्य वाचा: दोन किलो सोने कारागिराने केले लंपास; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

अनेक गावांचे सरपंच आणि कार्यकर्ते भाजपमध्ये (Sunita Bhangre)

मुंबई येथील भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सुनीता भांगरे, दिलीप भांगरे यांच्यासह अकोले तालुक्यातील अनेक गावांचे सरपंच आणि कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये स्वागत करण्यात आले. याप्रसंगी जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार वैभव पिचड, सीताराम भांगरे, कोपरगावचे माजी नगराध्यक्ष सुहास वहाडणे, विनायक देशमुख यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.