Sunita Williams:सुनीता विल्यम्स यांचा अंतराळातील मुक्काम वाढला!

0
Sunita Williams:सुनीता विल्यम्स यांचा अंतराळातील मुक्काम वाढला!
Sunita Williams:सुनीता विल्यम्स यांचा अंतराळातील मुक्काम वाढला!

नगर : भारतीय वंशाच्या नासातील अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Astronaut Sunita Williams) व त्यांचे सहकारी बुच विलमोर (Butch Wilmore) हे मागील ९ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र अर्थात इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये (ISS) अडकले आहेत. त्यांना परत पृथ्वीवर आणण्यासाठी नासा- स्पेसएक्स क्रू १० ही मोहीम आखली होती. मात्र या मोहिमेत तांत्रिक अडथळा (Technical obstacle) आल्याने या दोनच अंतराळवीरांचा परतीचा प्रवास पुन्हा लांबला आहे.

अंतराळवीर सुनीता विल्यम्स व त्यांचे सहकारी बुच विलमोर यांना परत पृथ्वीवर आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. फक्त ८ दिवसांच्या मोहिमेसाठी हे दोघे आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्राच्या मोहिमेवर गेले होते.मात्र त्यांना परत आणण्याची जबाबदारी असणाऱ्या यानामध्ये बिघाड झाल्यामुळे हे दोघे गेल्या ९ महिन्यांपासून तिथेच अडकले आहेत.

नक्की वाचा :मोठी बातमी!खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या 

नासाची मोहीम काय ?(Sunita Williams)

सुनीता विल्यम्स व बुच विलमोर यांना पृथ्वीवर परत आणण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून नासा व स्पेसएक्सतर्फे १३ मार्च २०२५ रोजी मोहीम आखण्यात आली होती. या मोहिमेची सर्व तयारीही करण्यात आली होती. आज १३ मार्च अर्थात गुरुवारी संध्याकाळी ७ वाजून ३ मिनिटांनी नासा- स्पेसएक्स क्रू १० मिशनच्या ‘फाल्कन ९’ रॉकेटचं प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आलं आहे. त्यामुळे सुनीता विल्यम्स व बुच विलमोर यांना परत आणण्याच्या मोहिमेत तांत्रिक अडथळा निर्माण झाला आहे.

अवश्य वाचा : ‘सुरेश धस यांना समज द्या’;पंकजा मुंडेंची पक्षाकडे मागणी 

कधी होणार रॉकेटचे प्रक्षेपण?(Sunita Williams)


फाल्कन रॉकेट लाँचसाठी आवश्यक असणारं हवामान नसल्यामुळे हे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आल्याची माहिती नासाकडून देण्यात आली आहे. नासाच्या लाँचिंग टीममधील क्रू मेंबर्सकडून लाँचिक सामग्रीतील हायड्रॉलिक यंत्रणेतील बिघाडावर काम सुरू करण्यात आलं आहे. फाल्कन रॉकेटच्या मार्गात पाऊस आणि वेगवान वारे असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रक्षेपण आता उद्या शुक्रवारी म्हणजेच १४ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजून ३ मिनिटांनी केलं जाणार आहे. नासाच्या रॉकेट लाँच कॅम्पस ३९ए या ठिकाणाहून हे प्रक्षेपण होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here