नगर : मागील नऊ महिन्यांपासून अंतराळवीर सुनीता विल्यम्स(Astronaut Sunita Williams)आणि बुच विल्मोर (Butch Wilmore) हे अंतराळात अडकले आहेत.आता त्यांच्या परतीचा मुहूर्त (Return Time)अखेर ठरला आहे.भारतीय प्रमाणवेळेनुसार हे दोघेही बुधवारी (ता.१९)(Wednsday) पहाटे पृथ्वीवर परत येतील. सुरुवातीला दोघेही आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून निघणार होते. मात्र ‘स्पेस एक्स’बरोबर चर्चा केल्यानंतर आणि फ्लोरिडामधील हवामानाचा अंदाज घेतल्यानंतर आज,मंगळवारीच दोघांच्या परतीचा प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे ‘नासा’ने (NASA) जाहीर केले आहे.
नक्की वाचा : औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले’- जितेंद्र आव्हाड
उद्या परतणार सुनीता विल्यम्स आणि बुच (Sunita Williams)

रविवारी ‘आयएसएस’मध्ये पोहोचलेल्या १० व्या चमूकडे सुनीता विल्यम्स आणि बुच यांच्या नवव्या चमूने सूत्रे सोपविल्यानंतर दोघांच्याही परतीच्या प्रवासाची तयारी सुरू झाली आहे.‘नासा’ आणि ‘स्पेस एक्स’च्या तंत्रज्ञांची बैठक होऊन फ्लोरिडामधील वातावरणाचा अंदाज घेतल्यानंतर त्यांच्या परतीचा प्रवास एक दिवस आधीच सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज, मंगळवारी सकाळी ८.१५ वाजता ‘स्पेस एक्स ड्रॅगन क्रू’ या अंतराळयानाचे ‘हॅच’ बंद करण्याची प्रक्रिया सुरू होईल. या क्षणापासून ‘नासा’च्या संकेतस्थळावर परतीच्या प्रवासाचे थेट प्रक्षेपण केले जाईल.
अवश्य वाचा : लाडकी बहीण योजनेत दुरुस्ती करणार,मात्र योजना बंद करणार नाही- अजित पवार
नासाचे इतर अंतराळवीर देखील परतणार (Sunita Williams)
‘नासा’चे अंतराळवीर निक हेग आणि रशियाच्या ‘रॉसकॉसमॉस’चे अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह हे देखील सुनीता विल्यम्स आणि बुच यांच्यासह परतीचा प्रवास करणार आहेत. वातावरणाने साथ दिल्यास उद्या,बुधवारी पहाटे ३.२७ वाजता सुनीता आणि बुच यांना घेऊन येणारी ‘स्पेस कॅप्सूल’ फ्लोरिडा किनाऱ्यापासून जवळ समुद्रात उतरेल,अशी माहिती देण्यात आली आहे.