Sunita Williams| भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी आतापर्यंत दोन वेळा अवकाशात भरारी घेतली आहे. त्यानंतर आता तिसऱ्यांदा सुनिता विल्यम्स अवकाशात गेल्या आहेत. सुनित विल्यम्स या बोइंग स्टारलायनरच्या (boeing starliner) यानातून अवकाश स्थानकावर पोहोचणाऱ्या पहिल्या अंतराळवीर (The first astronaut) आहेत. या कामगिरीमुळे त्यांचे संपूर्ण जगभरातून कौतुक होत आहे.
नक्की वाचा : देवेंद्र फडणवीस राजीनाम्याच्या तयारीत; निवडणुकीत हार-जीत होत असते : छगन भुजबळ
सुनिता विल्यम्सच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा दिवस (Sunita Williams)
बोइंग क्रू फ्लाइट टेस्ट या नावाने कमर्शिल क्रू प्रोग्राम सुरु करण्यात आला आहे. इंटरनॅशन स्टेशनवर नियमित क्रू फ्लाइटसाठी स्टालाइनर प्रमाणित करण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. हे मिशन यशस्वी झाल्यावर ते अंतराळवीरांना अवकाशातील प्रयोगशाळेत नेण्यासाठी आणि तेथून आणण्यासाठी दुसरे खाजगी अवकाशयान बनवेल. सुनिता विल्यम्सच्या कारकिर्दीतील हा महत्त्वाचा दिवस आहे. सुनिता विल्यम्स यांनी २००६- २००७ साली आणि २०१२ मध्ये सर्वाधिक स्पेसवॉक करणाऱ्या पहिल्या महिला अंतराळवीर असल्याचा विक्रम केला होता.
अवश्य वाचा : मनोज जरांगे फॅक्टर भाजपला महागात पडला; मराठवाड्यात भोपळा
सुनिता विल्यम्स जवळपास आठवडाभर अंतराळात थांबतील. स्पेस स्टेशनवर आवश्यक चाचण्या घेण्यात येतील. २०१२ मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या प्रवासात ट्रायथलॉन पूर्ण करणारी सुनिता विल्यम्स ही पहिला महिला ठरल्या होत्या.