नगर : भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) या मागच्या काही दिवसांपासून अंतराळात (Space) अडकल्या आहेत.अंतराळयानातील काही प्रमुख यंत्रणांमध्ये समस्या आढळून आल्याने त्या पुन्हा येऊ शकल्या नाहीत. अशातच आता त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकावरून एक व्हिडीओ संदेश जारी करत सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा (Diwali Wishes) दिल्या आहेत. व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी निमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांचा हा व्हिडीओ दाखवण्यात आला. या व्हिडीओत त्यांनी त्यांच्या वडिलांची आठवणही काढली.
नक्की वाचा : एकनाथ शिंदेंच्या संपत्तीत पाच वर्षांत तिप्पट वाढ!
काय म्हणाल्या सुनीता विल्यम्स? (Sunita williams)
या व्हिडिओत सुनीता म्हणाल्या की, अंतराळ स्थानकावरून मी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देते. यंदा मला पृथ्वीपासून २६० मैल दूर अंतराळात दिवाळी साजरी करण्याची संधी मिळाली आहे. माझ्या वडिलांनी आम्हाला दिवाळी आणि इतर सण साजरे करण्यास तसेच आपली सांस्कृतिक मुल्ये जपण्यास शिकवलं. दिवाळी हा आनंदाचा क्षण आहे, पुढे बोलताना त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे आभार मानलेत.
अवश्य वाचा : माढ्यात महायुतीचा उमेदवार ठरला,अजित पवार गटाकडून मिनल साठे मैदानात
विल्यम्स अजूनही अवकाशात का ? (Sunita williams)
५ जून रोजी सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर बोईंग स्टारलायनरच्या चाचणी मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकावर रवाना झाले होते. ही स्टारलायनरची पहिलीच मानवी मोहीम होती. ते आठ दिवसांत परत येण्याची अपेक्षा होती. परंतु, त्यांच्या परतीच्या प्रवासापूर्वी अंतराळयानातील काही प्रमुख यंत्रणांमध्ये समस्या आढळून आल्या. यानाला पुढे ढकलणार्या उपकरणात गळती झाली आणि त्यातील काही थ्रस्टर्स बंद पडले. या तांत्रिक बिघाडांमुळे स्टारलाइनर क्रूशिवाय पृथ्वीवर परतले. दरम्यान, दोघांनाही परत आणण्यासाठी नासाद्वारे प्रयत्न सुरु आहेत. ते फेब्रुवारी २०२५ मध्ये पृथ्वीवर परत येण्याची शक्यता आहे.