Sunpharma Chowk : सनफार्मा चौकातील रेणुका माता कमान काढण्याचे प्रशासनाचे आदेश

Sunpharma Chowk : सनफार्मा चौकातील रेणुका माता कमान काढण्याचे प्रशासनाचे आदेश

0
Sunpharma Chowk : सनफार्मा चौकातील रेणुका माता कमान काढण्याचे प्रशासनाचे आदेश
Sunpharma Chowk : सनफार्मा चौकातील रेणुका माता कमान काढण्याचे प्रशासनाचे आदेश

नगर : नवनागापूर ग्रामपंचायत (Navnagapur Gram Panchayat) हद्दीत असलेल्या सनफार्मा चौकातील वाहतूक कोंडी (Traffic Jam) सोडविण्यासाठी रेणुका माता कमान काढून घेण्याचे तात्पुरते सशर्त आदेश उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी जारी केले आहेत, तसेच यावर प्रभावित नागरिकांना १ एप्रिल २०२६ पर्यंत आपल्या हरकती नोंदविण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

नक्की वाचा : भविष्याच्या वाटचालीसाठी साहेबांना दिली तशीच साथ मला द्या : अक्षय कर्डिले

येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांना कमानीमुळे अडथळा

औद्योगिक वसाहत परिसरातून चौकात येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांना या कमानीमुळे मोठा अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवत होता. या कोंडीमुळे सामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच नवनागापूर परिसरात सार्वजनिक उपद्रव होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न (Law and order) निर्माण होऊ नये म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

हरकत घ्यायची असेल तर १ एप्रिल पर्यंत मुदत (Sunpharma Chowk)

ज्या व्यक्तींना या निर्णयाबाबत हरकत घ्यायची असेल त्यांनी १ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहून आपली बाजू मांडावी. विहित मुदतीत कोणतीही हरकत प्राप्त न झाल्यास अथवा योग्य कारणे न दिल्यास हा आदेश अंतिम केला जाईल. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर किंवा अडथळा निर्माण करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता २०२३ व भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील तरतुदींनुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.