Supa Police Station : सुपा पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी ज्योती गडकरी; दिवटे यांची नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली

Supa Police Station : सुपा पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी ज्योती गडकरी; दिवटे यांची नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली

0

Supa Police Station : नगर : पारनेर तालुक्यातील सुपा येथे चोरीच्या (Theft) संशयावरून ग्रामस्थांनी मारहाण केल्यानंतर पोलिसांच्या (Police) ताब्यात दिलेल्या हितेश कुमार रविश्वर प्रसाद या तरुणाचा सुपा पोलीस ठाण्यात (Supa Police Station) मृत्यू झाला होता. याप्रकरणी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत सुपा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांची शुक्रवारी (ता.२५) नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. तर त्यांच्या जागी ज्योती गडकरी (Jyoti Gadkari) यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आज पदभार स्वीकारला आहे. 

नक्की वाचा : पाथर्डीत जुगार अड्ड्यावर विशेष पोलीस पथकाचा छापा; ११ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

काही जणांनी संशयित तरुणाला केली होती मारहाण

मंगळवारी (ता. २२) मध्यरात्री दोनच्या सुमारास सुपा पोलिसांना नगर- पुणे रोडवरील सुपा टोलनाक्याजवळ एक पिकअप वाहन पकडण्यात आले असून, एका चोराला ताब्यात घेतले आहे. इतर चोर पळून गेले आहेत, पोलीस पाठवा, असा फोन आला. त्यानुसार पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सुपा टोलनाक्यावर काही जणांनी संशयित तरुणाला मारहाण केली होती. लोकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी तरुणाला पोलीस ठाण्यात आणले.

अवश्य वाचा : अमेरिकन टेक कंपन्यांना ट्रम्प यांचा स्पष्ट इशारा; आता भारत आणि चीनसारख्या देशांमधून होणार नाही भरती

हलगर्जीपणा केल्याने दिवटे यांची बदली (Supa Police Station)

बुधवारी (ता. २३) सकाळी सात वाजेच्या सुमारास त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे होते. पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याने सुपा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक दिवटे यांची पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  तसेच याप्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे.