Superintendent of Police : नगर : शहरातील आडते बाजार, दाळमंडई, तेलीखुंट, जुना दाने डबरा, वंजार गल्ली, तपकीर गल्ली, गंजबाजार या भागात माल देण्यासाठी व घेण्यासाठी आलेल्या टेम्पो व इतर वाहनांवर पोलिसांकडून वारंवार ऑनलाईन दंडात्मक कारवाई (Online Penalty Action) केली जात आहे. त्यामुळे वाहनचालकांचे अतोनात नुकसान होत असून ते बाजारपेठेत येण्यास नकार देत आहेत. त्यामुळे पोलीसांनी ऑनलाईन दंडाची कारवाई त्वरीत थांबवावी. तसेच बाजारपेठेत वाहतूक सुरळीत कशी करता येईल याकडे लक्ष देऊन वाहन चालकाला व व्यापा-यांना सहकार्य करावे. तसेच मंगलगेट पोलीस चौकी त्वरित सुरु करावी, अशी मागणी आडते बाजार व्यापारी असोसिएशनच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) सोमनाथ घार्गे (Somnath Gharge) यांच्याकडे केली आहे.
अवश्य वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यात दोन दिवस ‘यलो अलर्ट’
व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित
यावेळी आमदार संग्राम जगताप, आडते बाजार व्यापारी असोसिएशनचे संस्थेचे उपध्यक्ष गोपाल मणियार, सचिव संतोष बोरा, मार्केट कमेटी संचालक राजेंद्र बोथरा, राजेश गुगळे, सचिव विश्वनाथ कासट, अशोक भंडारी, सल्लागार रमेश सोनी मंडलेचा, मिलींद जागडा, संजय लोढा, माजी नगरसेवक विपुल शेटिया व व्यापारी उपस्थित होते.
नक्की वाचा : महादेवी हत्तीणीला नांदणी मठात परत आणण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेणार : मुख्यमंत्री फडणवीस
बाजारपेठ बंद पडण्याची वेळ (Superintendent of Police)
अहिल्यानगर मधील बाजारपेठ राज्यातील मोठी बाजारपेठ म्हणुन प्रसिध्द आहे. या बाजारपेठांमध्ये जिल्हयातून तसेच आजुबाजुच्या जिल्हयातील व तालुक्यातील दुकानदार व व्यापारी माल खरेदी विक्रीसाठी येत असतात. त्यामुळे साहजीकच बाजारपेठेत मोठया प्रमाणात माल वाहतुकीसाठी तीन-चार चाकी छोटे, मोठे टेम्पो येत असतात त्यामुळे बाजारपेठेत वाहतुकीची कोंडी होते. या बाजारपेठेत ठरावीक वेळेतच पोलीस अधूनमधून उभ्या असलेल्या मालवाहतुकदाराच्या गाडीचा फोटो काढुन ऑनलाईन दंड करत आहेत. त्यामुळे मालवाहतुक टेम्पो, वाहनचालक कोणताही माल घेण्यासाठी व देण्यासाठी बाजारपेठेत येण्यास तयार नाही. याचा बाजारपेठेवर खुपमोठा व्यवसायीक परिणाम होवुन बाजारपेठ बंद पडण्याची वेळ आली आहे. बाजारपेठेतील मंगलगेट पोलीस चौकी आहे. परंतू ती कायम बंद असते व येथे पोलीस दिसत नाही. ही पोलीस चौकी त्वरित चालू करून तेथे पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी. जेणेकरून बाजारपेठेतील चोऱ्यांना आळा बसेल, असे निवेदनात म्हटले आहे.