Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने फिरवला निकाल! चंदीगडमध्ये महापौरपदी आपचा उमेदवार

Supreme Court

0
Supreme Court

Supreme Court : नगर : चंदीगडमध्ये आम आदमी पक्षाला (AAP) मोठा विजय मिळाला आहे. महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत (Election) चंदीगडमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता. या मतमोजणीत आपचे जवळपास ८ मते अवैध ठरवण्यात आली होती. परंतु, ही मते आता वैध ठरवून चंदीगडच्या महापौर पदी आपचा उमेदवार घोषित करण्यात आला आहे. पीठासीन अधिकारी अनिल मसिह यांनी दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) रद्दबातल ठरवला आहे.

हे देखील वाचा: मनोज जरांगे पाटलांचा स्वतंत्र आरक्षणासाठी नकार

मतपत्रिकेवर टिक करतानाचा व्हिडिओ व्हायरल (Supreme Court)

३० जानेवारी रोजी झालेल्या चंदीगड महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने विजय मिळवला होता. या निवडणुकीत इंडिया आघाडीतील मित्र पक्षांचा पराभव झाला होता. निवडणूक प्रक्रियेत पीठासीन अधिकारी अनिल मसिह यांच्यावर फसवणूक आणि बनावटगिरी केल्याचा आरोप करत AAP ने सुप्रीम कोर्टात नव्याने मतदानाची मागणी केली. अनिल मसिह हे सीसीटीव्हीकडे पाहताना मतपत्रिकेवर टिक करतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.

Supreme Court

नक्की वाचा: पोलीस अधिकाऱ्याची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

अवैध ठरवलेली आठही मते ठरवली वैध (Supreme Court)

चंदीगड महापौरपदासाठी पुन्हा निवडणूक न घेता सध्याच्या मतपत्रिकांच्या आधारेच निकाल जाहीर केला जाईल, असं सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर, ३० जानेवारीला झालेल्या मतदान आणि मतमोजणीची संपूर्ण चित्रफीत आणि मतपत्रिकांचे मंगळवारी अवलोकन करण्यात आले. यावेळी अवैध ठरवलेली आठही मते वैध ठरवून पुन्हा मतमोजणी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. ही मतमोजणी पुन्हा झाल्यानंतर आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांचा विजय झाला आहे.

निकालावर न्यायालयाची टीका
चंदीगडमध्ये झालेली निवडणूक ही घोडेबाजार असल्याची टीकाही सर्वोच्च न्यायालयाने केली होती. त्यामुळे आता अनिल मसिह यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here