Supreme Court : शरद पवारांचे नाव व फोटो वापरणार नाही याची हमी द्या; सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला फटकारले

निवडणूक आयोगाने अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता दिलेल्या अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार यांची छायाचित्रे प्रचार साहित्यात का वापरत आहेत ? असा सवाल केला.

0
Supreme Court
Supreme Court

नगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Ncp) हे नाव आणि घड्याळ चिन्ह हे अजित पवार यांना दिलं. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. आज यावर सुनावणी पार पडली. यावेळी निवडणूक आयोगाने अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता दिलेल्या अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार यांची छायाचित्रे प्रचार साहित्यात का वापरत आहेत ? असा सवाल केला. शरद पवार यांच्या नावाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वापर करणार नाही, असे हमीपत्र दाखल करण्यास न्यायालयाने अजित पवार गटाला सांगितले. अजित पवार गटाने ‘घड्याळ’ व्यतिरिक्त दुसरे चिन्ह वापरावे, असेही न्यायालयाने तोंडी सांगितले.

नक्की वाचा : निलेश लंकेंनी चुकीची भूमिका घेऊ नये ;अजित पवारांचा इशारा

‘अजित पवार गटाने निवडणुकीसाठी ‘घड्याळ’ या चिन्हाशिवाय दुसरे चिन्ह वापरावे’ (Supreme Court)

शरद पवार यांच्या नावाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वापर करणार नाही,असे हमीपत्र दाखल करण्यास न्यायालयाने अजित पवार गटाला सांगितले. अजित पवार गटाने निवडणुकीसाठी ‘घड्याळ’ या चिन्हाशिवाय दुसरे चिन्ह वापरावे, जेणेकरून कोणताही गोंधळ होणार नाही, असेही न्यायालयाने तोंडी सांगितले. अजित पवार यांच्या गटाला अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता देण्याच्या आणि त्यांना घड्याळ चिन्ह वाटप करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या शरद पवार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती के. व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.

अवश्य वाचा : पाेलीस पाटलांच्या मानधनात वाढ; आता मिळणार १५ हजार रुपये

‘पक्षाने आपल्या सदस्यांना शिस्त लावणे आवश्यक’ (Supreme Court)

शरद पवार गटाची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, अधिकृत गट शरद पवार यांच्याशी ऐतिहासिकदृष्ट्या संबंधित असलेले ‘घड्याळ’ चिन्ह आणि प्रचार साहित्यात ज्येष्ठ पवारांची नावे आणि छायाचित्रे वापरत आहे. सिंघवी यांनी छगन भुजबळ यांनी केलेले विधान वाचून दाखवले. ग्रामीण मतदारांना आकर्षित करण्यासाठी पोस्टरमध्ये ‘घड्याळ’ चिन्ह आणि शरद पवारांची चित्रे वापरावीत, असे भुजबळ म्हणताना दिसतात.

“तुम्ही त्यांची छायाचित्रे का वापरत आहात ? तुम्हाला एवढा विश्वास असेल, तर तुमची छायाचित्रे वापरा ?” अशी विचारणा अजित पवार गटाची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मनिंदर सिंग यांना न्यायमूर्ती कांत यांनी केली. मनिंदर सिंग म्हणाले की पक्ष ते करत नाही आणि रस्त्यावरच्या कार्यकर्त्यांनी केले असावे. कार्यकर्त्यांद्वारे सर्व सोशल मीडिया पोस्टर्सवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार नाही, तेव्हा खंडपीठाने स्पष्टपणे सांगितले की, पक्षाने आपल्या सदस्यांना शिस्त लावणे आवश्यक आहे.

“आम्हाला तुमच्याकडून अत्यंत स्पष्ट आणि बिनशर्त हमी हवी आहे की, तुम्ही त्यांचे नाव, फोटो वापरणार नाही. यात कोणतेही ओव्हरलॅप होऊ शकत नाही,” असे न्यायमूर्ती कांत यांनी सिंग यांना सांगितले. यावर सिंग यांनी याबाबत हमीपत्र दाखल करण्याचे मान्य केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here