Supriya Sule : ‘महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या’ – सुप्रिया सुळे

आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याचा दिवशी सुळे यांनी  शेतकऱ्यांच्या व्यथा लोकसभेत मांडल्या आहेत.

0
'महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या' - सुप्रिया सुळे

नगर : आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला (Parliament Winter Session 2023) सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सुळे यांनी  शेतकऱ्यांच्या व्यथा लोकसभेत (Lok Sabha) मांडल्या आहेत. महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी (Farmers Loan Waiver) करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे जुने कर्ज माफ करून नवीन कर्ज देण्याची मागणीही सुळे यांनी केली आहे.

नक्की वाचा : तेलंगणात भारतीय वायुसेनेच्या विमानाचा अपघात ; २ जणांचा मृत्यू

लोकसभेत बोलतांना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, काही जिल्ह्यात ओला दुष्काळ पाहायला मिळत आहे, तर काही ठिकाणी यंदा पाऊसच झालेला नाही. महाराष्ट्र आणि माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघात शेतकरी प्रचंड अडचणीत सापडलेत. वातावरणात झालेल्या बदलामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे द्राक्ष, कांदा, केळी, गहूpolitics, कापूस, सोयाबीनसह पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पश्चिम महाराष्ट्रमधील नाशिक, बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी देखील अडचणीत आला असल्याचे  सुळे म्हणाल्या आहेत.

हेही वाचा : ‘पिल्लू बॅचलर’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

 केंद्रीय पथकाने  महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकाची  पाहणी करावी. तसेच महाराष्ट्राला केंद्राने मदत करून कष्ट करणाऱ्या महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी. तसेच त्यांना नवीन कर्ज देखील देण्यात यावे, अशी मागणी सुळे यांनी लोकसभेत केली आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here