Supriya Sule : आली रे आली भाजप सरकारला हद्दपार करण्याची वेळ आली; सुप्रिया सुळे यांचा हल्लाबाेल

Supriya Sule : आली रे आली भाजप सरकारला हद्दपार करण्याची वेळ आली; सुप्रिया सुळे यांचा हल्लाबाेल

0
Supriya Sule
xr:d:DAF5Y3epXKI:877,j:2698079986159986237,t:24040411

Supriya Sule : नगर : वीजेची दरवाढ (Electricity price hike) करून शेतकऱ्यांचे कंबरडं मोडण्याचे पाप या सरकारने केलेलं आहे. दुसरीकडे ज्येष्ठ नागरिक जे औषधे घेतात. त्या औषधांचा देखील भाव वाढलेला आहे. हे अगदी दुर्दैवी आहे, अशा बेराेजगारी, भ्रष्टाचारी, महागाईच्या सरकारला हद्दपार करण्याची वेळ आली आहे. वीज दरवाढी विरोधात शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या.

हे देखील वाचा: ज्यांनी दादांची साथ सोडली, ते जनतेची साथ काय देणार; राधाकृष्ण विखेंची लंकेंवर टीका

सुप्रिया सुळे म्हणाल्या (Supriya Sule)

”दिवसेंदिवस महागाईने जनता हाेरपळून निघत आहे. आमची वैयक्तिक कुणाशीही लढाई नाही. ही लोकशाही आहे की दडपशाही आहे? या दडपशाहीच्या विरोधात पूर्ण ताकदीने इंडिया आघाडी आता रस्त्यावर उतरली आहे. हम लढेंगे और जितेंगे. आम्ही काेणत्याही कारवाईला घाबरणार नाही. कारण आम्ही या सगळ्या प्रक्रियेमध्ये लोकशाही पद्धतीने निवडणूक लढलेलो आहोत. पण दडपशाहीच्या विरोधात, महागाईच्या विरोधात, भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही ताकदीने उतरलो आहोत. सत्ता आणि पैशांचा जो गैरवापर महाराष्ट्र आणि केंद्र सरकार करत आहे,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

नक्की वाचा: फुटबाॅल खेळ रुजवण्यासाठी गाॅडविन डिक यांचे माेलाचे याेगदान ः नरेंद्र फिराेदिया

सरकारी यंत्रणांच्या गैरवापराचा आरोप (Supriya Sule)

आयकर विभाग, ईडी, सीबीआय यांचा गैरवापर तसेच निवडणुकीची प्रक्रिया यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ही बाब नागरिकांसाठी वेदनादायी व चिंताजनक आहे. आणीबाणी देशात लागू नाही. परंतु, तशी परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा दबक्या आवाजात समाजात सुरु आहे. ही बाब लाेकशाही देशासाठी घातक विषय आहे. दडपशाहीच्या दिशेने पाऊले टाकली जातात का? अशी सातत्याने काळजी सरकार घेत असलेल्या काही निर्णयातून होत आहे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बाेलताना व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here