Supriya Sule : शेवगाव: जो आपल्या शेतीमालाला भाव देईल, आपल्याला वेळेवर पाणी देईल व शेतकरी हिताचे जो निर्णय घेईल, असा माणूस आपल्याला खासदार (MP) म्हणून हवा आहे, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केले. शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव फाटा येथे नीलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या प्रचारार्थ त्या बोलत होत्या.
हे देखील वाचा: ‘मराठा एक झाल्याने पंतप्रधान मोदी गोधड्या घेऊन महाराष्ट्रात मुक्कामी’- मनोज जरांगे
सुप्रिया सुळे म्हणाल्या (Supriya Sule)
अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. बरेच लोक इथे बोलतात आमच्याबद्दलही सगळे बोलतात मी काय फार त्याची काळजी करत बसत नाही. त्याचं कारण असं की आमचं मन साफ आहे. आम्ही कुठलीही गोष्ट करताना कुणाचा अपमान कधी केली नाही. आज आपण पाहतोय तुमच्या कापसाला भाव मिळणार आहे का? या देशातील भ्रष्टाचार कमी होणारे का? आमच्या बारामतीला येऊन देवेंद्रजी म्हणले होते की, पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ मग का नाही दिलं.
नक्की वाचा: सर्वोच्च न्यायालयाकडून अरविंद केजरीवालांना दिलासा! १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर
महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती (Supriya Sule)
दहा वर्ष झाली पार्लमेंटचा रेकॉर्ड काढून बघा मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजासाठी सगळ्यात जास्त कोण पार्लमेंट मध्ये बोलला असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. शेतकरी, शेतमजूर, महिला, सामान्य माणूस या सर्वांचा जीएसटी च्या माध्यमातून मोठा तोटा झालेला आहे. याच जीएसटी मुळे देशातील सरकार बदलले आहे. याच स्वरूपात महाराष्ट्रातील सरकार ही बदलेल असा विश्वास वाटतो. याप्रसंगी शिवसेना जिल्हाध्यक्ष राजेंद्र दळवी, प्रतापराव ढाकणे, अविनाश मगरे, कॉम्रेड सुभाष लांडे, संजय नागरे, राम शिदोरे, कल्याण काळे, आम आदमी पार्टीचे अजित फटके यांची भाषणे झाली. याप्रसंगी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऋषिकेश ढाकणे, हरीश भारदे, सुनील रासने, दत्ता फुंदे, सचिन गवारे, राजेंद्र आढाव, अशोक देवढे, मच्छिंद्र अर्ले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.