Supriya Sule : सुप्रिया सुळेंचे होणारे जावई सारंग लखानी कोण?

0
Supriya Sule: सुप्रिया सुळेंचे होणारे जावई सारंग लखानी कोण?
Supriya Sule: सुप्रिया सुळेंचे होणारे जावई सारंग लखानी कोण?

Supriya Sule : नगर: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची मुलगी रेवती सुळे यांचं लग्न ठरलं असल्याची माहिती समोर आली आहे. नागपूरचे सारंग अरुण लखानी यांच्यासोबत रेवती सुळेंचं लग्र ठरलं असल्याची माहिती माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे यांनी दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत या लग्नाबाबत त्यांनी माहिती दिली आहे. सारंग अरुण लखानी नागपूरचे असल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या मध्यस्थीने खासदार सुप्रिया सुळेंच्या मुलीचं लग्न ठरल्याची माहिती समोर येत आहे.

शरद पवारांचे होणारे नातजावई सारंग लखानी कोण?

शरद पवारांचे होणारे नातजावई सारंग लखानी हे विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरुण लखानी यांचे पुत्र आहेत. माहितीनुसार, सारंग लखानी एक चांगले बॅडमिंटनपटू देखील आहेत. त्यांनी आतापर्यंत विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे.

हे वाचा: अजितदादांच्या वारशावरून राष्ट्रवादीत यादवी?

नक्की पहा : सावेडीतील नित्यसेवा येथील विहिरीत मरताहेत मासे

कोण आहेत रेवती सुळे? (Supriya Sule)

रेवती सुळे या 27 वर्षांच्या असून त्यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1998 रोजी बारामती येथे झाला आहे. त्यांनी मुंबईतील द कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आहे. रेवती यांचं महाविद्यालयीन शिक्षण ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स’मधून घेतलं आहे. त्यांनी 2023 मध्ये मास्टर्स इन पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदवी मिळवली. रेवतीने यांनी राजकारणात प्रवेश केलेला नाही. मात्र त्या आपल्या आईच्या निवडणूक प्रचारात सक्रिय असतात. 2024 मध्ये बारामती लोकसभा निवडणुकीत त्यांनी आई सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात भाग घेत रोड शो आणि मेळाव्यांचा सहभाग नोंदवलेला.