नगर : ‘बिग बॉस मराठी’ च्या (Bigg Boss Marathi) ट्रॉफीवर आपलं नाव कोरून महाराष्ट्राच्या (Maharashtra News) घराघरांत पोहोचलेलं नाव म्हणजे, गुलिगत स्टार सूरज चव्हाण.(Suraj Chavan) अगदी साध्या आणि गरीब परिस्थितीतून आलेल्या सूरजला संपूर्ण महाराष्ट्रानं साथ दिली. गेल्या काही दिवसांपासून ‘सूरज लग्न कधी करणार? अशा चर्चा रंगलेल्या पाहायला मिळत आहे. आता याचं उत्तर सर्वांना मिळाले आहे. झापुक झुपूक स्टार सूरज चव्हाणची सध्या लगीनघाई सुरू झाली आहे.
नक्की वाचा: कोकणातील राजकारणात आता बच्चू कडूंची एन्ट्री!
सुरज चव्हाणचं लग्न कधी ? (Suraj Chavan)

काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर सूरजच्या होणाऱ्या पत्नीचा चेहरा आणि नाव समोर आले होते. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.आता अखेर सूरज चव्हाणच्या लग्नाची तारीख आणि ठिकाण देखील ठरलं आहे. सूरज आपल्या आयुष्याच्या नवा प्रवासाची सुरुवात कधी आणि कुठे करणार ? याबाबत ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावकरनं मोठा खुलासा केला आहे. तिनं सांगितलं की, सूरज चव्हाणचा लग्न सोहळा २९ नोव्हेंबरला पार पडणार आहे. त्यांचा हा पारंपरिक विवाह सोहळा पुण्याजवळील जेजूरी, सासवड इथे होणार आहे. लग्नाच्या मुख्य समारंभापूर्वीचे विधी २८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत.
अवश्य वाचा: शेतकरी कर्जमाफीवर केलेल्या वक्तव्यावर राधाकृष्ण विखे पाटलांचा यू-टर्न
सूरज चव्हाणची होणारी बायको कोण? (Suraj Chavan)
‘बिग बॉस मराठी’ फेम सूरज चव्हाणनं काही दिवसांपूर्वी आपल्या होणाऱ्या बायकोसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेले. पण, त्यानं तिचा चेहरा दाखवला नव्हता. तेव्हापासूनच सूरजची होणारी बायको कोण? हा प्रश्न चाहत्यांना पडला होता. मात्र आता सूरज चव्हाणच्या होणाऱ्या बायकोबाबतची उत्सुकता संपली असून ती कॅमेऱ्यासमोर आली आहे. सध्या सूरजवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय, पण ती सूरजला भेटली कुठे? हा प्रश्न चाहत्यांना पडलाय. याचाही खुलासा झाला आहे. सुरजच्या बायकोच नाव संजना असून ती सूरजच्या चुलत मामाची मुलगी आहे. गंमत म्हणजे, सूरज आणि संजनाचं अरेंज मॅरेज नसून लव्ह मॅरेज आहे. सूरज आणि संजना एकमेकांना लहानपणापासून ओळखतात.



