Suraj Chavan:गुलीगत सुरज चव्हाणची ‘राजाराणी’ चित्रपटात एन्ट्री 

0
Suraj Chavan:गुलीगत सुरज चव्हाणची 'राजाराणी' चित्रपटात एन्ट्री
Suraj Chavan:गुलीगत सुरज चव्हाणची 'राजाराणी' चित्रपटात एन्ट्री

नगर : ‘बिग बॉस मराठी’च्या (Big Boss Marathi) नव्या पर्वाने सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. या नव्या पर्वात एका स्पर्धकाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घालणारा हा स्पर्धक म्हणजे टिक टॉक स्टार सूरज चव्हाण (Suraj Chavan). बिगबॉसमध्ये जाताच अल्पावधीतच सूरजने प्रेक्षकांची मन जिंकत त्यांच्यावर राज्य केलं. लवकरच सूरज ‘राजाराणी’ (RajaRani Marathi Movie) या चित्रपटातून मोठा पडदा गाजवताना दिसणार आहे. 

नक्की वाचा : नराधमांना छत्रपती शिवरायांच्या काळातील ‘चौरंग’ शिक्षा द्या,रितेश देशमुखची मागणी

सुरज चव्हाण रुपेरी पडदा गाजवणार (Suraj Chavan)

बिग बॉस या रिऍलिटी शोद्वारे सूरज जरी प्रेक्षकांच्या भेटीला आला असला तरी तो आता मोठ्या पडद्यावर ही झळकण्यास सज्ज आहे. मागील काही दिवसांपूर्वीच ‘राजाराणी’ या चित्रपटाच्या पोस्टरने सगळ्यांची मन जिंकली. सूरज आता सत्य घटनेवर आधारित उलगडणार्‍या या प्रेम कथेतून महत्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात मुख्य कलाकाराच्या मित्राच्या भूमिकेत सूरजला पाहणं फारच रंजक ठरणार आहे.

अवश्य वाचा : शेतकऱ्यांसाठी खुशखबर!फळ आणि फुलांच्या लागवडीसाठी मिळणार अनुदान

राजाराणी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत रोहन पाटील आणि वैष्णवी शिंदे ही कलाकार मंडळी दिसणार आहेत. तर चित्रपटातील रोहनच्या मित्राच्या भूमिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत सुरज दिसणार आहे. या चित्रपटात भारत गणेशपुरे, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, भक्ती चव्हाण, शिवाजी दोलताडे, तानाजी गलगुंडे या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहे

‘राजाराणी’ हा चित्रपट १८ ऑक्टोबर पासून सर्वत्र प्रदर्शित (Suraj Chavan)

‘सोनाई फिल्म क्रिएशन’ प्रस्तुत ‘राजाराणी’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन व निर्मिती गोवर्धन दोलताडे यांनी केली आहे. तर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी शिवाजी दोलताडे यांनी सांभाळली आहे. संगीत दिग्दर्शन पी. शंकरम, पार्श्वसंगीत विजय नारायण गवंडे, गायक आदर्श शिंदे, हर्षवर्धन वावरे, अनविसा दत्तगुप्ता, नागेश मोरवेकर हे आहेत. तर छायांकन कृष्णा नायकर, एम. बी. अलीकट्टी यांनी केले आहे. सूरजचा ‘राजाराणी’ हा चित्रपट १८ ऑक्टोबर २०२४ पासून जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here