Suresh Dhas : पारनेर: भाजप (BJP) आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांचा मुलगा सागर धस (Sagar Dhas) यांच्याकडील वाहनाने झालेल्या अपघातात (Accident) दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.अहिल्यानगर-पुणे रस्त्यावर पारनेरच्या सुपा शिवारात सोमवारी (ता.७) रात्री अकरा वाजता हा अपघात झाला. याबाबत स्वप्नील पोपट शेळके यांनी सुपा पोलिसांत फिर्याद दिली आहे. सुपा पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली आहे.
नक्की वाचा : ‘मराठी माणसं आमच्या पैशावर जगतात’, निशिकांत दुबेंच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
अपघातावेळी वाहनात दोघेजण
पारनेरच्या जातेगाव घाट फाट्यावर हा अपघात झाला असून यात नितीन प्रकाश शेळके (वय ३४,रा.पळवे खुर्द, ता. पारनेर) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. अपघातावेळी वाहनात सागर सुरेश धस (रा.आष्टी,बीड) आणि सचिन दादासाहेब कोकणे (रा. तवलेवाडी, ता.आष्टी, जि. बीड) हे दोघेजण होते.
अवश्य वाचा : ‘मीरा भाईंदर राड्यासाठी सर्वस्वी फडणवीस जबाबदार’-सुप्रिया सुळे
दोघांची पोलिसांनी वैद्यकीय तपासणी (Suresh Dhas)
अपघात झाल्यानंतर त्याची माहिती सुपा पोलिसांना कळविण्यात आली. त्यानंतर जखमी दुचाकीस्वाराला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच दुचाकीस्वराचा मृत्यू झाला होता. सुपा पोलिसांनी सागर धस याच्याकडील वाहन ताब्यात घेतले आहे. वाहनातील सागर आणि सचिन या दोघांची पोलिसांनी वैद्यकीय तपासणी केली आहे. पारनेर तालुक्यातील सुपा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद घेण्यात आली आहे.