नगर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरणाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर बीड (Beed) जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारावे अशी मागणी होत आहे. भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी आज बीडच्या पालकमंत्री पदाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी पहिली पसंती ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असेल तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडचं पालकमंत्री पद स्वीकारलं तरी आपली हरकत नसल्याचे म्हटले आहे.
नक्की वाचा : आरटीजीएस आणि एनईएफटीचा वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी आरबीआयचा मोठा निर्णय
‘आम्हाला अजित पवार पालकमंत्री झाले तरी चालतील’ (Suresh Dhas)
पुढे बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपद हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारावं अशी मागणी होत आहे. यासंबंधी चर्चेवर देखील भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “आमची पहिली पसंती ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आहे आणि जर मुख्यमंत्री नाही झाले तर आम्हाला अजित पवार झाले तरी चालतील. आम्हाला काही अडचण नाही. अजित पवार आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर ते मुख्यमंत्र्यांसारखंच सगळ्यांना सुतासारखा सरळ करतील, कारण अजित पवारांच्या हाताखाली मी काम केलं आहे. वेड्या वाकड्या गोष्टी त्यांना जमत नाहीत. ते स्पष्ट सांगतात की हे भंगार आहे हे करू नका”.
अवश्य वाचा : ‘स्थळ’ चित्रपटाद्वारे सचिन पिळगांवकर यांचे चित्रपट प्रस्तुतीत पदार्पण; पोस्टर प्रदर्शित
एक जागा रिक्त राहिली म्हणून काही फरक पडतो का ? (Suresh Dhas)
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर बोलताना आमदार धस म्हणाले की, “त्यांच्याच पक्षातील लोक म्हणत आहेत. मी अजून राजीनामा मागितला नाही. पण प्रकाश सोळंके जिल्ह्यातील ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की, यांचा राजीनामा घ्या. कुणाला संधी देऊ नका. एखादं मंत्रीपद रिक्त राहु द्या. एक जागा रिक्त राहिली म्हणून काही फरक पडतो का? ही आमच्यासाठी ही चांगली गोष्ट आहे. शरद पवार यांच्याकडून वळालेला मतदार हा अजित पवार यांच्याकडे आला होता. अजित पवार यांनी निर्णय घेतला नाही तर त्यांना हे मतदार टिकवता येणार नाहीत. त्यांनी निर्णय घेतला तर हा मतदार त्यांना चिकटणार आहे, हे वास्तव सत्य आहे”, असेही सुरेश धस यावेळी म्हणाले आहेत.