Suresh Kalmadi Passed Away: ज्येष्ठ काँग्रेस नेते सुरेश कलमाडी यांचे निधन;’असा’होता त्यांचा पायलटपासून राजकारणापर्यंतचा प्रवास 

0
Suresh Kalmadi Passed Away: ज्येष्ठ काँग्रेस नेते सुरेश कलमाडी यांचे निधन;'असा' होता त्यांचा पायलटपासून राजकारणापर्यंतचा प्रवास 
Suresh Kalmadi Passed Away: ज्येष्ठ काँग्रेस नेते सुरेश कलमाडी यांचे निधन;'असा' होता त्यांचा पायलटपासून राजकारणापर्यंतचा प्रवास 

Suresh Kalmadi Passed Away : पुण्याचे माजी खासदार आणि क्रीडा विश्वातील मोठे नाव असलेले सुरेश कलमाडी (Suresh Kalmadi) यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन (Passed Away) झाले. ते ८२ वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते आजारपणाशी झुंज देत होते. त्यांच्या निधनाने पुण्याच्या (Pune News) राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

नक्की वाचा: ‘क्रांतिज्योती’ची पोरं महाराष्ट्रभर ठरली सुपरहिट! पहिल्याच वीकेंडला कोटींची कमाई  

सुरेश कलमाडी यांच्यावर गेल्या काही काळापासून दीर्घकालीन आजारामुळे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार चालू होते. मात्र आज पहाटे ३.३० च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. सुरेश कलमाडी यांचे पार्थिव आज दुपारी २ वाजेपर्यंत त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी नवी पेठ येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पुणे शहरातील अनेक दिग्गज राजकीय नेते आणि त्यांचे समर्थक दर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी गर्दी करत आहेत. त्यांच्यामागे त्यांची पत्नी, मुलगा, सून, दोन मुली, जावई आणि नातवंडं असा परिवार आहे.

अवश्य वाचा: लाडकी बहीण योजना महापालिकेतही गेमचेंजर ठरणार? कधी मिळणार डिसेंबरचा हफ्ता?  

सुरेश कलमाडी यांची कारकीर्द (Suresh Kalmadi Passed Away)

राजकारणात येण्याआधी सुरेश कलमाडी हे १९६४ ते १९७२ या काळात भारतीय हवाई दलात पायलट म्हणून कार्यरत होते. १९७४ साली ते सेवेतून निवृत्त झाले आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत झाले. तिथून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. १९९५ ते १९९६ या काळात काँग्रेसप्रणीत केंद्र सरकारमध्ये त्यांनी रेल्वे खात्याचे राज्यमंत्री म्हणूनही कार्यभार पाहिला होता. पुण्याचे खासदार, केंद्रीय मंत्री आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे (IOA) अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले.

‘पुणे फेस्टिव्हल’ आणि ‘पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन’च्या माध्यमातून त्यांनी पुण्याला जागतिक नकाशावर आणले.कलमाडी यांनी आपल्या कार्यकाळात राजकीय जबाबदाऱ्यांबरोबरच भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे अध्यक्षपदही भूषवलं होतं. याशिवाय ते प्रदीर्घ काळ पुण्यातून खासदार म्हणून निवडून जात होते.

२०१० ला कलमाडी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप

२०१० साली दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेवेळी सुरेश कलमाडी यांच्यावर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. एप्रिल २०११ साली त्यांच्यावर दोषसिद्धीही झाली. मात्र त्यानंतरही
 क्रीडा क्षेत्रात सुरेश कलमाडी यांचा प्रभाव पाहायला मिळत होता. २०१६ साली सुरेश कलमाडी व अभय सिंह चौटाला यांना भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या पॅनलचे आजीवन अध्यक्ष म्हणूनही नियुक्त करण्यात आलं होतं. मात्र, कलमाडी यांनी तेव्हा ही जबाबदारी नाकारली होती.